24th June Headlines: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेहून इजिप्तला जाणार आहेत. त्यांचा हा इजिप्तचा पहिलाच दौरा असून आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करता तो महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच मान्सून आज संपूर्ण विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. 


उद्धव ठाकरे करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन


आज शिवाजी नाट्य मंदिर येथे शाखा प्रमुखांना मुंबईतील शिवसैनिकांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. सकाळी 11 वाजता मुंबईतील शाखा प्रमुख विभाग प्रमुख आमदार, खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. 1 जुलैला मुंबई महापालिकेवर काढला जाणारा मोर्चा त्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा आणि मार्गदर्शन या बैठकीमध्ये अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावावे त्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची असणार आहे.


मणिपूर हिंसाचाराप्रश्नी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक


मणिपूर संदर्भात केंद्र सरकारने आज दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहतील.


मान्सून येत्या 72 तासात सक्रिय होणार  


मान्सून 29 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने सांगितला आहे. येत्या 72 तासांच्या आत मुंबईत मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, 26 जून रोजी मान्सून मुंबई दाखल झाल्यास आत्तापर्यंतचा सर्वात उशिरा दाखल होण्याची नोंद होणार. याआधी 2019 साली 25 जून रोजी मान्सून दाखल झाला होता.


मान्सून आज विदर्भ व्यापणार 


आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता असून नागपूर वेध शाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.


मराठा मंदिराचा अमृत महोत्सव
 
मराठा मंदिर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज संध्याकाळी 4 वाजता मराठा मंदिर येथे कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहतील. 


भारतीय एअर फोर्सचा सराव 


भारतीय एअरफोर्स आज आपली ताकद दाखवणार आहे. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर भारतीय लष्कराची लढाऊ विमाने आज लॅण्डिंगचा सराव करणार आहेत. यावेळी जॅग्वार, सुखोई, मिराजसारखे हवाई दल दाखवणार स्टंट दाखवतील. सुलतानपूर-पूर्वांचल द्रुतगती महामार्गाच्या हवाई पट्टीवर लढाऊ विमाने उतरवण्याची तयारी करण्यात आलीय. विमानाच्या लँडिंगसाठी आज हा सराव होतोय. मात्र जर हवामान खराब असेल तर हा  सरावाचा कार्यक्रम 25 जून रोजी  होईल.


पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय इजिप्त दौरा 


पंतप्रधान नरेन्द्र मोदी भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 6 वाजता इजिप्त दौ-यावर निघतील. संध्याकाळी 5.55 वाजता कैरो एअरपोर्टवर मोदींच स्वागत केलं जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.05 वाजता इजिप्तचे पंतप्रधांसोबत मोदींची चर्चा होईल. तसचं रात्री 9 वाजता दोन्ही देशाच्या वरिष्ट अधिक-यांसोबत ही चर्चा होईल. रात्री 9.30 वाजता भारतीय समुदायासोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील. रात्री 10. 10 च्या दरम्यान पंतप्रधान मोदी इजिप्तच्या ग्रॅण्ड मुफ्तीसोबत आणि रात्री 11 नंतर इजिप्त वरिष्ठ नेत्यांसोहत चर्चा करतील. दोन दिवसाच्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल अल सीसी यांच्या सोबत अनके करारावर चर्चा करतील. पंतप्रधान मोदींची पहिली इजिप्तची यात्रा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रसिद्ध असलेली पुरातनअल हाकिम मशिदीत सुद्धा जातील. या अल हाकिम मशिदच जिर्णोधार 1980 मध्ये बोहरी मुस्लीम समाजाने केला होता. काही दिवसापुर्वी श्रीनगरमध्ये झालेल्या जी -20 च्या बैठकीत पाकिस्तान, चीन, तुर्की, सौदी अरब सोबत इजिप्तसुद्धा सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे हा इजिप्तचा दौरा महत्वाचा आहेत. तसच या दौऱ्यात पंतप्रधान मोदी काहिरा येथी लेलियोपीस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव स्मशानभूमीला ही भेट देतील. पहिल्या विश्व युद्धात 4000 भारतीय सैनिक शहीद झाले होते. यांना पंतप्रधान मोदी श्रद्धांजली अर्पित करतील.      


पालखी अपडेट 


संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पहाटे लवकर होणार असून सराटीमधून निघून महाराजांच्या पादुकांना सकाळी 7 वाजता निरा स्नान घालत पालखी पुणे जिल्ह्याचा निरोप घेईल. त्यानंतर नदी पार करून सकाळी अकलूजमध्ये दाखल झाल्यावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे तिसरे गोल रिंगण सकाळी 9 वाजता येथील माने विद्यालयाच्या मैदानावर पार पडेल. यावेळी नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे संत तुकाराम महाराज पालखीच्या रिंगण सोहळ्यासाठी  उपस्थित असणार आहेत. आज तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम अकलुजमध्येच असेल. 


संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नातेपुतेहून प्रस्थान ठेवणार असून सायंकाळपर्यंत माळशिरस येथे दाखल होईल. वाटेत पुरंदवडे येथे माउलींच्या पालखीचे दुपारी दोन नंतर पहिले गोल रिंगण पार पडणार आहे.


ममता कुलकर्णीच्या याचिकेवर आज सुनावणी


मुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ममतानं तिच्या विरोधात अमलीपदार्थ तस्करी प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फरार आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आणि तिचा पती विकी गोस्वामीसह ममता गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात वास्तव्यास आहे.