22 December Headlines: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनादरम्यान 12 मोर्चे निघणार आहेत. चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढल्यामुळे देशात आणि राज्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जातीये. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे. 


नवनीत राणा कोर्टात हजर राहणार का?
मुंबई – शिवडी दंडाधिकारी कोर्टात नवनीत राणा यांच्याविरोधात दाखल बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयानं राणा आणि त्यांच्या वडिलांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावलाय तसेच त्यांच्याविरोधात जारी अजामानपात्र वॉरंटही रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आज नवनीत राणा शिवडी कोर्टात हजर राहणार का? 


राज्यात पुन्हा मास्क बंदी?  
चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढल्यामुळे देशात आणि राज्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जातीये. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यात राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार का? इतर राज्यातून विमानातून येणाऱ्या प्रवाशांनी टेस्ट सक्ती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 


विधीमंडळ अधिवेशनात आज 12 मोर्चे -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज 12 मोर्चे निघणार आहेत. यातला पोलीस पाटील संघटनेचा मोर्चा महत्वाचा असणार आहे. कोकणातील रिफायनरी विरोधक आज नागपुरात एक दिवसाच आंदोलन केलं जाणार आहे. सरकारने मांडलेल्या 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत. 


घोड्यांची शर्यत -
नंदुरबार – सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हल मध्ये आज घोड्यांची शर्यत होणार आहे. घोड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो अश्व शैकिन दाखल होणार आहे. दीडशेहून अधिक अश्व यात सहभागी होणार आहेत.


 माळेगावची यात्रा -
नांदेड – श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगावची यात्रा आजपासून सुरू होणार आहे. दुपारी 2 वाजता शासकीय पूजा करून यात्रेला सुरूवात होईल. देशभरातील विविध राज्यातून घोडा, गाढव, उंट, कुत्रा, मांजर, बैल, गाय म्हैशी घेऊन व्यापारी यात्रेच्या बाजारात सहभागी होतात.


नागपूर – भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचं आज राज्यस्तरीय संम्मेलन असून दिवसभर चालणाऱ्या या संम्मेलनात एका सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित राहणार आहे.


सातारा – देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी रथ पूजन कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इतर मंत्री सुद्धा उपस्थित रहाणार आहेत. 


टोलचा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. टोल वसुलीला विरोध केल्यानंतर आता निलेश राणे आज सकाळी 10 वाजता हातिवले टोल नाक्यावर हजर राहणार आहेत. यावेळी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा असे मेसेज सध्या फिरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोलचा प्रश्न आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही


नागपूर - लेखक राजेश कोचरेकर यांनी लिहिलेले नागपूर थंडी, अधिवेशन आणि महासंत्तातर यावर चर्चा - एकाच मंचावर मुख्यमंत्री, बाळा नांदगावकर आणि प्रताप सरनाईक असतील. या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 


 राज्यातील सर्व जिल्ह्यांनी टेस्ट- ट्रॅक- ट्रिट -वॅक्सिनेट आणि कोव्हीड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रत्येक आरटीपीसीआर नमुना जीनोम सिक्वेन्सीसाठी पाठवा, आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्यांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर आदेश. प्रत्येक जिल्हा /मनपा ने आपले टेस्टिंग वाढवावे टेस्ट मधील आरटीपीसीआर चे प्रमाण वाढवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.  



दिल्ली- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार अलर्ट झालेय. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यांनी आपतकालीन बैठक बोलवली आहे.  


लखनौ- यूपीचे सीएम सीएम योगी आदित्यनाथ कोरोनासंदर्भात टीम-9 सोबत बैठक बोलवली. 


भोपाळ- मध्यप्रदेश विधानसभामध्ये काँग्रेसनं आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर गोंधळ होण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिवराज सिंह सकाळी 11 वाजता उत्तर देणार आहेत. 


श्रद्धा वालकार हत्याकांडातील आरोपी अफताब याच्या जमीनावर साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे. 
 


दिल्ली - धनगर आदिवासी आरक्षणावरून महाराष्ट्राच्या खासदारांमध्ये खडाजंगी
संसदेमध्ये धनगर आणि आदिवासी यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी महाराष्ट्राच्याच खासदारांमध्ये पाहायला मिळाली. शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित जे पालघर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी आपल्या वक्तव्यात धनगरांना एसटीमधूनआरक्षण देण्यास विरोध केला. धनगर हे कसे लाभार्थी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात ज्यांचं सरकार आहे त्यांची भूमिका धनगरांच्या आरक्षण विरोधी असल्याचा आरोप केला. कुठल्याही समाजाचं सध्याचं आरक्षण न हिरावता न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं त्यानंतर शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी देखील पक्षाची भूमिका हीच असल्याचे स्पष्ट केलं. भाजपच्या खासदार हिना गावित यांनी कुठल्याही पद्धतीने आदिवासी आरक्षणात एखाद्या समाजाला सामावून घ्यायचं असेल तर त्याचा निर्णय हा सखोल अभ्यास आणि निष्कर्षाशिवाय व्हायला नको अशी भूमिका मांडली. 


काठमांडू  - तुरुंगातून बाहेर येणार 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज, 19 वर्षापासून नेपाळच्या तुरुंगात कैद - नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. हत्येच्या आरोपाखाली तो 2003 पासून नेपाळी तुरुंगात बंद आहे. त्याची सुटका झाल्यानंतर 15 दिवसांत त्याला हद्दपार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.