सोलापूर : शिवजन्मोत्सवामुळे राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. सोलापुरातदेखील शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. या निमित्ताने सोलापुरात शिवरायांची तब्बल 21 फूट इतकी उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती अतिशय भव्य आणि आकर्षक आहे. सोनेरी रंगात ही मूर्ती रंगवण्यात आली आहे.

मूर्तीकार सत्यजित रामपुरे यांनी या मूर्तीची निर्मिती केली आहे. मूर्तीसाठी तब्बल 2 महिने 4 मूर्तीकार दररोज 5 ते 6 तास काम करत होते. माजी आमदार दिलीप माने यांच्या संकल्पनेतून ही मूर्ती साकारली आहे. जन्मोत्सवादिवशी डी. एम. प्रतिष्ठानतर्फे मूर्तीची सोलापूर शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.