सांगली : ऐन निवडणुकीच्या काळात सांगलीच्या वाळवामधून 20 धारदार तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सांगली पोलीस दलातील गुंडविरोधी पथकाने ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या तलवारीची किंमत जवळपास 40 हजार रुपये आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
गुंडविरोधी पथकाचे प्रमुख संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली. लोकसभा निवडणूक काळात तलवारींचा हा साठा सापडल्याने अटकेतील दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यातून आणखी गंभीर माहिती मिळण्याची शक्यता आहे. सोमनाथ दिनकर पाटील आणि हणमंत काकासाहेब जाधव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणानंतर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी बेकायदा हत्यार बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री जिल्ह्यात ‘आपरेशन आलआऊट’ मोहिम राबविण्यात आले. या मोहिमेत गुंडविरोधी पथक सहभागी झालं होतं. त्याचवेळी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना वाळवा येथे सोमनाथ पाटील व हणमंत जाधव यांच्याकडे तलवारींचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती मिळाली.
पथकाने मध्यरात्री दोघांच्या घरावर छापा टाकला. दोघांच्या घरांची झडती घेतली असता 20 धारदार तलवारी सापडल्या. या तलवारी आनलाईन मागविल्या असल्याची माहिती आरोपींनी दिली असून प्रत्येक एक तलवार त्यांना एक हजार रुपयाला मिळाली होती. पुढे ते दोन हजार रुपयाला एक तलवार विकणार होते, अशी माहिती तपसातून पुढे आली आहे.
निवडणुकीच्या काळात सांगलीतून 20 धारदार तलवारी हस्तगत, गुंडविरोधी पथकाची कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2019 01:27 PM (IST)
गुंडविरोधी पथकाचे प्रमुख संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली. लोकसभा निवडणूक काळात तलवारींचा हा साठा सापडल्याने अटकेतील दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यातून आणखी गंभीर माहिती मिळण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -