1st March Headlines : विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतील. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक राहणार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात आक्रमक राहणार आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री आज उत्तर देतील. यावेळी राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होण्याची शक्यता आहे. 


मुंबई काँग्रेसतर्फे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) विरोधात आंदोलन 
 
मुंबई – मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. अदानी समुहाने जो आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचार केलेला आहे त्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने त्यांना मदत केलेली आहे, त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे, सकळी 11 वाजता. 


नवाब मलिकांच्या जामीनावर आज कोर्टात सुनावणी


नवाब मलिकांच्या जामीनावर आजही कोर्टात सुनावणी सुरू राहील. मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. त्याचसोबत मलिकांवर तपासयंत्रणेनं केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचंही त्यांच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितलंय.


सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस


सलग तिसऱ्या आठवड्यात मंगळवारपासून सुनाणीला सुरूवात झालीये. ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यावर शिंदेंकडून नीरज कौल यांनी युक्तीवादास सुरूवात केली. पक्षांरबंदी कायदा आणि राज्यपालांच्या भूमिकेवरून कोर्टात घमासान. तर राज्यपालांनी त्या परिस्थितीत जे निर्णय घेतले ते त्यांचं कर्तव्य होतं असा दावा नीरज कौल यांनी केला. तसेच बोम्मई केसनुसार तो राज्यपालांचा अधिकार आहे असा दावा कौल यांनी केलाय. 


आजपासून या नियमांमध्ये बदल होणार 



  • ग्राहकांना एटीएममधून 2 हजाराच्या नोटा मिळणार नाही.

  • आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्याने त्याचा परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार.

  • घरगुती सिलेंडर, सीएनजी, पीएनजी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

  • रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता. 

  • ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सना नियमांचे पालन करावे लागणार


आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी 1 मार्चपासून सुरू


बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या 25 टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी 1 मार्चपासून सुरू होणार आहे. यासाठीची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली असून प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची यादी आणि कार्यवाही ही देण्यात आली आहे. लॉटरीसाठी अर्ज विचारात घेतला जावा यासाठी अनेक पालक एकापेक्ष अधिक अर्ज भारतात मात्र एका विद्यार्थ्यांचे एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे प्राथमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे. 

हिंगोली जिल्हात उन्हाची तीव्रता लक्षात घेता परिषद शाळेच्या वेळेत बदल 


उन्हाची तीव्रता लक्षात घेता आज पासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल केलाय. सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू असणार जिल्हा परिषद शाळा.


कुणाल भंडारी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नगर शहरात निषेध मोर्चा 


अहमदनगर – बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर काल झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नगर शहरातून निषेध मोर्चा निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे तर दिल्ली गेटपर्यंत मोर्चा जाणार आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सखल हिंदू समाजच्या वतीने हा मोर्चा होणार आहे, दुपारी 3 वाजता.


जळगाव जामोद येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची सभा 


बुलढाणा – जळगाव जामोद येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची सभा होणार आहे. या सभेसाठी उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शुभांगी पाटील संबोधित करणार आहेत, संध्याकाळी 6 वाजता


सचिन तेंडुलकरची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत 
 
मुंबई – सॅव्हलॉन कंपनीकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत योगदान देण्यात येत आहे. अशात सचिन तेंडुलकर याला ब्रॅंड ॲम्बॅसिडॉर नेमण्यात आलं आहे. यासंदर्भात सचिन एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत देणार आहे, सकाळी 11 वाजता. 


भारत-ऑस्ट्रेलिया सामना  


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.