कोल्हापूर: डॉक्टर बनण्यासाठी राज्यातल्या 19 विद्यार्थ्यांनी खोटं जातप्रमाणपत्र बनवून वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जातीच्या कोट्यातून मुंबई आणि कोल्हापुरातल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला.


 

वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयात प्रवेश घेताना राखीव असणाऱ्या कोट्यात प्रवेश घेऊन काही विद्याथी शिकत होते. पण आडनाव वेगळं आणि जात वेगळी असं लक्षात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली.

 

दरम्यान, कुठलंही जात प्रमाणपत्र 19 विद्यार्थ्यांच्या नावावर देण्यात आलं नसल्याचं या चौकशीतून स्पष्ट  झालं. त्यामुळं या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढण्यात आलं असून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.