19 January Headlines: मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी आज मुंबईत येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण, 20 दवाखान्यांच्या लोकार्पणासह मलजल प्रक्रिया केंद्र, रुग्णालयांच्या इमारती, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण या कामांचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची बीकेसी येथे एक मोठी सभा होणार आहे. यासाठी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. ते 5 ते 6.10 एमएमआरडीए मैदानवरती लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहतील. संध्याकाळी 6.30 पंतप्रधान मोदी गुंदवली मेट्रो स्टेशन - 6.30 ते 7 मेट्रो उद्घाटन आणि मेट्रोतून प्रवास करणार. संध्याकाळी 7.5 मेट्रो स्टेशन मधून निघणार  7.15 मुंबई विमान तळावरून दिल्लीला रवाना होतील. सुरक्षतेची खबरदारी लक्षात घेता मेट्रो-1 ची सेवा बंद रहाणार. संध्याकाळी 5.45 ते 7.30पर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे.


पंतप्रधानांचा मोदींचा कर्नाटक दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी कर्नाटकात यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट देतील.          दुपारी 12 वाजता यादगिरी जिल्ह्यातील कोदेकल इथे पंतप्रधान सिंचन, पिण्याचे पाणी तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. दुपारी 2.15 च्या सुमारास पंतप्रधान कलबुर्गी जिल्ह्यातील मालखेडला पोचतील. इथे ते नव्याने वसविलेल्या गावांतील पात्र नागरिकांना जमिनीचे मालकी पत्र वितरीत करतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.


ज्योतिरादित्य शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर 


कोल्हापूर- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे आज आणि उद्या असे दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर इचलकरंजीत शिंदेंचा दौरा असेल. या दौऱ्यात शिंदे इचलकरंजी शहरातील भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होती.


महाविकास आघाडीची पत्रकार परिषद 


मुंबई – आज दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होईल. यावेळी नाशिक आणि नागपूर संदर्भातील घोषणा केली जाईल. अखेर चर्चेअंती उमेदवारांबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. 


बारामती - कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि अजित पवार हजर राहणार


बारामती मधील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि अजित पवार हजर राहणार. अजित पवार हे आज सकाळी 8.30 वाजता कृषी प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज सकाळी 10 वाजता कृषी प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत. 


आज सकाळी 10 वाजल्यापासून कुस्तीपटू पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलन करणार 


नवी दिल्ली - राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून त्यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी भारतातील दिग्गज कुस्तीपटूंनी बुधवारी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. या आंदोलनात टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक कुस्तीपटू सहभागी झाले होते. यानंतर बृजभूषण सिंह यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले, तर यानंतर आमच्याकडे सगळे पुरावे आहेत मोदींनी कधीही बोलवावं आम्ही सगळे पुरावे देऊ, असं प्रत्युत्तर विनेश फोगाटने, दिलंय. तसचं याची दखल क्रिडा मंत्रालयाने आणि दिल्ली महिला आयोगाने याची दखल घेतलीय. येत्या 72 तासातं याचं उत्तर द्यावं अस क्रिडा खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, आज सकाळी 10 वाजल्यापासून कुस्तीपटू पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत. 


ओशो आश्रम आंदोलन


पुणे - ओशो आश्रम आंदोलन...आचार्य ओशो रजनीश यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून ओशो भक्त आश्रमाच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र, आश्रम प्रशासनाकडून (ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन) भक्तांना समाधीस्थळी जाण्यास, तसेच ओशो यांची माळ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही असा दावा करत ओशो भक्त आज सकाळी 11 वाजता ओशो आश्रमाजवळ निषेध आंदोलन करणार आहेत.


वाशिम :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज आंदोलन


वाशिमच्या रिसोड शहरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज आंदोलन. पिक विमा आणि परतीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदत भरपाई मिळावी या करिता आज आंदोलन असणार आहे. यावेळी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर ही उपस्थित असणार आहेत. 


नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या रणनीती संदर्भात आज शिक्षक सेनेची महत्वाची विभागीय बैठक


नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या रणनीती संदर्भात आज शिक्षक सेनेची महत्वाची विभागीय बैठक होणार आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. 


बंजारा ब्रिगेड तर्फे आज जामनेर येथे महामोर्चा 


जळगाव - बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावे, बैआहार राज्याप्रमाणे ओबीसी जनगणना व्हावी, जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ओढरे गावातील दोनशे  शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा त्यांच्या नावे लावण्यात याव्यात. यासह विविध मागण्यासाठी बंजारा ब्रिगेड तर्फे आज जामनेर येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी 8 ते 10 हजार बंजारा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


सत्यजीत तांबे यांचा श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात दौरा


शिर्डी - आज सत्यजीत तांबे यांचा श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात दौरा आहे. शिक्षकांच्या भेटीगाठी ते घेण्यासाठी हा दौरा असण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा तुळजापूर दौरा


उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा तुळजापूर दौरा. सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरने तुळजापूर येथे आगमन होणार आहे. दर्शन घेऊन अक्कलकोट कडे जातील. राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मंदिर परिसरात उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.