मुंबई: सरकार विरोधात महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. या मोर्च्याच्या आयोजनाबाबत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. 17 तारखेला होणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होईल.


साताऱ्यात शाहू महाराज स्मृतिदिन कार्यक्रम


शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेत श्रीमंत कोकाटे, धनाजी मासाळ आणि आदिनाथ बिराजे यांचीही भाषणे होतील. हॉटेल मराठा पॅलेस, सातारा 


पोलिस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस 


उस्मानाबाद- पोलिस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत भरतीसाठी 11 लाख अर्ज आल्याची माहिती आहे. म्हणजे एका जागेसाठी साधारण 80 उमेदवार स्पर्धा करणार आहेत. 


आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे


मुंबई- वरळीतील आंबेडकरवादी आणि बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटना आणि छोटे पक्ष आणि वरळीकर जनता यांच्या वतीनं आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात आज बंद करण्यात येणार आहे. हा एक दिवसीय बंद सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे.


नागपूर ते शिर्डी मार्गावर आजपासून एसटी सेवेला सुरुवात


समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी मार्गावर आजपासून एसटी सेवेला सुरुवात होईल. दोन्ही बाजूनी रात्री 9 वाजता बस निघेल व पहाटे 5.30 वाजता पोहचेल. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति रु.1300/- व मुलांसाठी रू.670/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात 100% मोफत तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50% सवलत असणार आहे.


राज ठाकरे यांचे कार्यक्रम


मुंबई- शिवाजी पार्कमध्ये आयोजित मनसेच्या जत्रा महाराष्ट्राची कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत, संध्याकाळी 6 वाजता


मुंबई- साकीनाका येथे मनसे आयोजित मनसे महोत्सवला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत, संध्याकाळी 5.30 वाजता


आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा कृषी अधिकारी कार्यालयावर आंदोलन 


अमरावती-  शेतकऱ्यांच्या पिक विमा आणि इतर मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा कृषी अधिकारी कार्यालयावर आंदोलन होणार आहे.