सोलापूर : पॉलिटेक्निक कॉलेजचं इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये रुपांतर करु नये, यासाठी 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंना मेसेज केले आहेत. त्यामुळे संतापून त्यांनी याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
सतत जागा भरल्या जात नसतील तर त्या पॉलिटेक्निक कॉलेजचं इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये रुपांतर करावं, असा निर्णय सरकारने घेतला होता.
सोलापूरच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी सरकारने हा निर्णय रद्द करावा, यासाठी शिक्षणमंत्र्यांना मेसेज पाठवण्याची मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवले आहेत.
मेसेज पाठवण्यामागे स्टुडेंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचा हात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवण्याची मोहिम थांबवावी आणि लेखी माफी मागावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा विनोद तावडेंनी दिला आहे.