नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाची हत्या
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 20 Jul 2016 06:42 AM (IST)
नवी मुंबई : नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. स्वप्निल सोनावणे असं मृत मुलाचं नाव आहे. नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये ही घटना घडली. मुलगा आणि मुलगी पहिलीपासून एकाच वर्गात होते. तेव्हापासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या घरच्यांना हे संबंध मान्य नसल्याने कुटुंबीयांनी स्वप्निलला घरी बोलवून घेतलं आणि जबर मारहाण केली. यानंतर उपचारासाठी स्वप्निलला डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी सागर नाईक (भाऊ, वय 25 वर्ष), राजेंद्र नाईक (वडील, वय 50 वर्ष), साजेश नाईक (भाऊ, वय 22 वर्ष), दुर्गेश पाटील (मित्र, वय 22 वर्ष), आशिष ठाकूर (मित्र, वय 23 वर्ष) या पाच आरोपींना अटक केली आहे.