गोंदियात अल्पवयीन मुलाकडून मित्राची गळा दाबून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2018 11:20 AM (IST)
एकीकडे पहाटे मंदिरात प्रवचनाचा कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे एका 15 वर्षाच्या मुलाने 12 वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियामध्ये घडली.
(पुष्कर परिहार)
गोंदिया : एकीकडे पहाटे मंदिरात प्रवचनाचा कार्यक्रम सुरु असताना दुसरीकडे एका 15 वर्षाच्या मुलाने 12 वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियामध्ये घडली. काल (गुरुवार) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास देवरी तालुक्याच्या चिचगड गावात हा धकक्कादायक प्रकार घडला. यात 12 वर्षाच्या पुष्कर परिहार या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी 15 वर्षाच्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आपल्या पालकांसोबक प्रवचनाला गेलेल्या या दोन अल्पवयीन मुलांमध्ये खेळता-खेळता अचानक भांडण सुरु झालं. त्यामुळे चिडलेल्या 15 वर्षाच्या मुलाने थेट पुष्करचा गळाच आवळला. एकीकडे हा धक्कादायक प्रकार सुरु असताना या मुलांच्या पालकांचं मात्र तिकडे लक्ष नव्हतं. दरम्यान, बऱ्याच वेळानंतर पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी पुष्करला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला असून 15 वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे.