15 January Headlines :  आज राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह असरणार आहे. देशासह राज्यातही अनेक ठिकाणी सामुहिक पतंगबाजी होणार आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रामकुंडावर स्नान करण्याला विशेष महत्व असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकंदराबादला विशाखापट्टनवरून जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

  


राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह
आज राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह असरणार आहे. देशासह राज्यातही अनेक ठिकाणी सामुहिक पतंगबाजी होणार आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रामकुंडावर स्नान करण्याला विशेष महत्व असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे.  


मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धा


कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज पहाटे 5.15 वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरूवात होणार आहे. मॅरेथॉनला पोहचण्यासाठी विशेष लोकल बोरीवलीहून पहाटे 3.45 वाजता सुटणार आहे. मॅरेथॉनला सिलीब्रिटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत.  



बीडच्या गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम
 संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर कार्यक्रम होणार आहे.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडेही उपस्थिती लावणार आहेत. 


रत्नागिरीत कल्याण विधी सोहळा 


 आज प्रसिद्ध अशा मार्लेश्वर या ठिकाणी कल्याण विधी सोहळा अर्थात देवाचं लग्न सकाळी 10 नंतर संपन्न होणार आहे. राज्यातील ही अनोखी प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आलेली असून आजही तितक्याच भक्तिभावाने जपली गेली आणि साजरी केली जातेय. 


अमरावतीत आजपासून शंकरपटाला सुरूवात
विदर्भात सर्वात प्रसिध्द असलेला शंकरपट रविवारपासून सुरू होतोय. तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाद्वारे चार दिवसीय शंकरपटाच आयोजन करण्यात आलंय. रविवारी दो-दाणी, सोमवार - मंगळवारी एकदानी आणि बुधवारी महिलांचा शंकरपट होणार आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकंदराबादला विशाखापट्टनवरून जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.  


सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा 


 सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरु आहे. सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह शनिवारी पार पडला. त्यानंतर आज संध्याकाळी यात्रेतील होम प्रदीपन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर भाकणूक कार्यक्रम पार पडेल. बाजरीच्या पाच पेंड्यांना साडी, चोळी, खण आणि मंगल चिन्हाचा वापर करुन कुंभार कन्येचे रुप देण्यात येते. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते पुजा करुन हा होमप्रदीपन विधी पार पडतो. तर होम विधी सोहळ्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम होईल. आगामी वर्ष कसा असेल या संदर्भात सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत भाकनुक केली जाते. संध्याकाळी 5 नंतर या सोहळ्याला सुरुवात होईल. 


भारत श्रीलंका दरम्यान अंतिम सामना


भारत आणि श्रीलंका दरम्यान अंतिम सामना दुपारी 1.30 वाजता तिरूअनंतपुरम येथे होणार आहे.