सांगली : मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास सांगली न्यायालयाने साडे 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गिरीश गुमास्ते असं या नराधमाचं नाव असून, त्याने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन वेळा विनयभंग केला.


दोन वर्षापूर्वी सांगलीच्या मिरजेमध्ये गिरीश गुमास्तेने घराच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तीन वेळा तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. आज या खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली.

यात सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी गिरीश गुमास्ते यास दोषी ठरवत, बाल लैंगिक छळ कायदातंर्गत 14 वर्षे  तुरंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच 20 हजार रुपये दंड ठोठावली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर आपल्याला न्याय मिळाल्याची भावना पीडित मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.