Dhule: आपल्या मृत आईच्या मारेकर्‍यांना पकडून माझ्या आईला न्याय द्या, या मागणीसाठी मृत मोहिनी जाधव या महिलेच्या 14 वर्षीच्या मुलीनं शेकडो पोलिसांच्या फौजफाट्यात घुसून साक्री नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. हे बघून पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. माझ्या मृत आईच्या मारेकऱ्यांना अद्यापही का ताब्यात घेतले नाही? याचा जाब त्या चिमुकलीनं पोलिस अधिकाऱ्यांना विचारत आंदोलन केले. यादरम्यान पोलीस प्रशासनातर्फे त्या चिमुकलीला आंदोलन करण्यापासून अडवले व तिला तिच्या मामाला घरामध्येच पोलिसांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.


साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापूर्वी मतदान मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निकालानंतर रात्री राजकीय वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी झाली. ज्यात मोहिनी जाधव या 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मृत मोहिनी जाधवच्या नातेवाईकांनी तिच्या मारेकऱ्यांना पकडून मोहिनी जाधवला न्याय मिळावा यासाठी वारंवार आंदोलनं केली. आज साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडत आहे. यादरम्यान मृत मोहिनी जाधव या 14 वर्षीय मुलीने अद्यापही आपल्या आईच्या मारेकऱ्यांना का पकडले नाही? असा जाब विचारत साक्री नगरपंचायतीच्या कार्यालयाबाहेर पोलिस प्रशासनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.


आईच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडून आईला न्याय मिळाला नाही तर या 14 वर्षीय चिमुकलीने आत्मदहन करण्याचा लिस अधिकाऱ्यांना इशारा दिलाय. मुलीने केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची यावेळी एकच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र माझी आई मला परत मिळवून द्या असा हट्ट करत या मुलीने रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने या मुलीला ताब्यात घेतले.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha