14 March Headlines :  राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे.  राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. 
 


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी 


महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा सुरू होईल तर दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात नवी तारीख काय असणार याचे उत्तर मिळणार आहे. 


राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर


राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामध्ये सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालये, सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसू शकतो. संप काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पेपर तपासणीवर त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर जाहीर करताना विलंब होऊ शकतो. त्याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर पुन्हा एकदा जात असल्याने बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.  राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत. 


माकपच्या मोर्चाचा तिसरा दिवस


नाशिकवरून मुंबईकडे निघालेलं लाल वादळ मुक्कामानंतर मुंढेगाववरून सकाळी पुन्हा मुंबईकडे निघणार आहे. विविध मागण्यांसाठी माकप, किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. 


राज्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशन


राज्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातील आठवड्याचा आज दुसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी आजही विरोधक आक्रमक होतील. अर्थसंकल्पीय आदेशनावरती चर्चा झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. चर्चेदरम्यान विरोधकांनी अर्थसंकल्पावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यामुळे उपमुख्यमंत्री यांच्या फक्त देताना काही राजकीय आरोप सुद्धा होण्याची शक्यता आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधकांचं सभागृहाच्या बाहेर आंदोलन होणार आहे. 


कोल्हापूरचे ठाकरे गटाचे नेते संग्राम कुपेकरांचा भाजप प्रवेश  
 
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेते संग्राम कुपेकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिवंगत नेते बाबा कुपेकर यांचे ते पुतणे आहेत. मुंबईत भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 12.30 वाजता हा प्रवेश होणार आहे. 


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं बजेट


पिंपरी पालिकेचे बजेट आज सकाळी 11 वाजता आयुक्त सादर करणार आहेत. मिळकत कर आणि पाणी पट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


हसन मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी


राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. 
 
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार व कर्मचारी संघटन आजपासू संपावर


महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार व कर्मचारी संघटन आजपासून अनिश्चित कालीन संपावर आहे. याच संपामध्ये नागपूर महानगरपालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. फक्त अग्निशमन आणि महापालिकेचे रुग्णालय अशा आकस्मिक सेवेचे कर्मचारी सोडून आजपासून महापालिकेचे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता सर्व कर्मचारी संविधान चौकात एकत्रित आंदोलन करणार आहेत.