कोरेगाव-भीमा, (पुणे) : कोरेगाव-भीमा इथं 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तब्बल आठवडाभरानं पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत. हे सर्व बारा आरोपी कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील आहेत. दोन्ही गटातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यानं या बाराही आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. अटक केलेल्या आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला, किंवा यामागे नेमकं कोण होतं? या सर्व गोष्टींची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, आठवड्याभरानंतर 12 जणांना अटक करण्यात आलेली असली तरीही पोलिसांचा याप्रकरणी अजूनही या भागात तपास सुरुच आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम करत असून जे दोषी आढळतील त्यांना अटक करण्यात येणार आहे. नेमकं प्रकरण काय? 1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला होता. या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. संबंधित बातम्या :कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखलसंभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाने इतिहासाची मोडतोड केली : भिडे गुरुजी‘मला अडकवण्यासाठी कौरवनितीचा वापर’, भिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रियादेशाचे तुकडे होण्याआधी मी मरण पत्करेन : उदयनराजेभिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरणकोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहनकोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थथर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तासभिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चादलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकरदलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजेसणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदपुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणातसणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री