मुंबई : राज्यातील 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.


10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे :


 

  1. पुणे सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे डीआयजी अजित व्ही पाटील यांची पदोन्नती होऊन औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आलीय.


 

  1. महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संचालक कैसर खालिद यांची पदोन्नती होऊन पीसीआरला विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.


 

  1. औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.


 

  1. आयपीएस अधिकारी अमोघ गांवकर यांची सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती


 

  1. एसपीएस जी. एम. पाटील यांची अहमदनगरचे सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती


 

  1. आयपीएस सुनील फुलारी यांची ‘एसआरपीएफच्या ग्रुप I, पुणे’चे कमांडंट म्हणून नियुक्ती


 

  1. नागपूरच्या डीसीपी निर्मला देवी यांची पीसीआर नागपूरच्या पोलीस अधिक्षकपदी बदली


 

  1. आयपीएस महेश घुर्ये यांची ‘एसआरपीएफच्या ग्रुप 8, मुंबई’चे कमांडंट म्हणून नियुक्ती


 

  1. भरत तांगडे यांची ‘एसआरपीएफच्या ग्रुप III, जालना’चे कमांडंट म्हणून नियुक्ती


 

  1. पंजाबराव उगले यांची नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती