अहमदनगर : दहा ते अकरा लाख रुपये किंमतीच्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव पोलिसांनी पुणतांबा चौफुलीवर ही कारवाई केली.


सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या वॅगनआर कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली. MH 40 KR 5445 या कारमधून ही रोकड नेण्यात येत होती. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसात जुन्या, रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत होती. या काळात अनेकांनी रांगा लावून बँकांमध्ये जुन्या नोटा जमा केल्या. त्यानंतरही ज्यांच्याकडे जुन्या नोटा शिल्लक आहेत, त्यांना रिझर्व बँकेत योग्य आणि समर्पक कारण देऊन जुन्या नोटा जमा करण्याची मुभा आहे. 1 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंतची मुदत ही प्रामुख्याने एनआरआय किंवा नोटाबदलीच्या 50 दिवसांत देशाबाहेर असलेल्या नागरिकांसाठी आहे.

रिझर्व्ह बँकेनेही जवळ जुन्या नोटा ठेवू नये, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल, असं अगोदरच स्पष्ट केलं आहे. मात्र त्यानंतरही जुन्या नोटा पुन्हा आढळल्या आहेत.

केंद्र सरकारचा जुन्या नोटांसंबंधीचा आदेश

केंद्र सरकारकडूनही जुन्या नोटांबाबत वटहुकूम जारी करण्यात आला होता. त्यामुळे हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा जवळ बाळगणं महागात पडू शकतं. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडे सापडल्यास त्यावर दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

500-1000 च्या जुन्या नोटाबदलीसाठी RBI कडून 'सेकंड चान्स' ?


ठाण्यातून जुन्या पाचशे आणि हजार रुपयाच्या 29 लाख 97 हजाराच्या नोटा जप्त


वटहुकूम जारी, जुन्या नोटा बाळगल्यास मोठा दंड!


RBI ला नवी पाचशे, दोन हजारची एक नोट छापण्यासाठी किती खर्च?


पाचशे रुपयांची जुनी नोट आता कायमची चलनातून हद्दपार