Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon Rains) जोरदार बॅटिंग करत अक्षरक्ष: झोडपून काढले आहे., मंगळवारी (20 मे) संध्याकाळपासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह तूफान पाऊस झालाय. तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. परिणामी, राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. अशातच 22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

सिंधुदुर्गासह कोकणात पावसाचा कहर, अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा अंधारात

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने कोकणात मुसळधार ते अतिमुसाधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढलं आहे. तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला असून अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा अंधारात आहे. शेतकऱ्यांची मशागतीची काम देखील या अवकाळी पावसामुळे खोळंबून पडली आहेत. तर मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा मत्स्य खात्याकडून देण्यात आला आहे. कोकणातील अनेक भागांत गेल्या 12 ते 13 तासांपासून लाईट नसल्याचे ही पुढे आले आहे. दमदार पाऊस आणि वादळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील मालवण, आचरा, कुंभारमात्ठ, वेंगुर्ला, माणगाव, पेंडुर वीजखंडीत झालेली असून ती पूर्ववत करण्याचे काम सध्या MSEB मार्फत सुरु आहे.

तब्बल 15 तास वीजपुरवठा खंडित

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत, म्हणजेच जवळपास सहा सबस्टेशनमध्ये वीजखंडीत झालेली असून ती पूर्ववत करण्याचे काम MSEB मार्फत सुरु आहे. यात मालवण, आचरा, कुंभारमठ, वेंगुर्ला, माणगाव, पेंडुर या सबस्टेशनचा समावेश आहे. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे या कामात अडथळा निर्माण होत आहे. सद्यस्थिती वेंगुर्ला आणि माणगाव सबस्टेशनवरील पुरवठा पूर्ववत झाला असून उर्वरित मालवण, पेंडुर, आचरा, कुंभारमठ या सबस्टेशन वरील पुरवठा पुढील चार तासांत पूर्ववत होईल, असे MSEB कडून कळविण्यात आले आहे. याबाबत आम्ही सातत्याने MSEB विभागाच्या संपर्कात असल्याची माहिती सिंधुदुर्ग पालकमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पुढील ३-४ तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा 

सिंधुदुर्गात ४०-५० किमा प्रति ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, सोबतच विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज 

रत्नागिरीत काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस, ३०-४० किमी प्रती ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये)

मालवण- 114कुडाळ-  75.5कणकवली-58वैभववाडी-41मुळदे-93.4 रामेश्वर-118.8सावंतवाडी-130देवगड-53

मागील 24 तासातील पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये) 

रत्नागिरी - 86.9  सातारा - 59.5कोल्हापूर -36.8 नाशिक - 33.8 कुलाबा - 22.9 सांताक्रुज (मुंबई) - 62 सांगली - 24.4