Maharashtra Weather Update : राज्यभरात परतीच्या पावसाने एकच धुमाकूळ घालत मोठं नुकसान केल्याचे चित्र आहे. दरम्यान अलीकडे झालेल्या पावसाची दाहकता आता समोर आली असून यात बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने यावर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. एकट्या यवतमाळ (Vidarbha Rain Update) जिल्ह्यात जून ते आतापर्यंत दोन लाख 91 हजार 842 शेतकऱ्यांच्या 2 लाख 74 हजार 607 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी जवळपास 200 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

Continues below advertisement

वार्षिक पर्जन्यमानाच्या शंभर टक्के पाऊस, 16 व्यक्तींचा तर 293 जनावरांचा मृत्यू

दरम्यान, नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता नुकसान भरपाई तातडीने मिळेल, अशी घोषणा केली. मात्र यवतमाळ आणि वाशिम जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळाली यात यवतमाळ जिल्हा हा अद्यापही मदतीपासून वंचित आहे. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाच्या शंभर टक्के पाऊस झाला आहे. यात 1442 गावे बाधित झाले असून 2 लाख 91 हजार 842 शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले आहे. तर 110 महसूल मंडळापैकी 105 मंडळात अतिवृष्टी झाल्याची घटना घडली आहे. यासह नैसर्गिक आपत्तीमुळे 16 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अतिवृष्टीमुळे 293 जनावरांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तीन हजार 666 घरांचे नुकसान झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

चार वर्षीय बालकाचा नालीत पडून दुर्दैवी मृत्यू 

पावसाच्या पाण्यात चार वर्षीय बालकाचा नालीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात पावसाचं पाणी घरासमोरील वाहत्या पाण्याच्या सिमेंट नालीमध्ये पडून या चार वर्षीय बालकाचा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय वाशिमच्या गोंडेगाव येथे हि घटना घडली. स्वराज अशोक खिल्लारे हा 4 वर्षीय बालक मूळचा हिंगोलीच्या जामठी गावचा असून बाळाची आई माहेरी गोंडेगाव इथं आली असता ही दुर्दैवी घटना घडली.

Continues below advertisement

वाशिम जिल्ह्यातील पाऊसामुळे गावातील नदी-नाल्यांचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. याच वेळी मृतक स्वराज हा घराबाहेर असतांना पाय घसरून पडला. मात्र पावसाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आणि नालीच्या तोंडावर सिमेंटे पाईप असल्याने त्याचा लवकर पत्ता लागला नाही. उशिरा हि बाब लक्षात आल्यानंतर तासाभराच्या शोधानंतर नालीमध्ये अडकल्यामुळे स्वराजचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने नाली खोदून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकाचा आणि आईने बाळा पाहून टाहो फोडला. या वेळी गावात हे दृश्य पाहून स्मशान शांतता पसरली होती.

ही बातमी वाचा: