काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक दिग्गजांची गर्दी
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2019 05:06 PM (IST)
गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषि अशा महत्वाच्या खात्यांसह तब्बल 22 खाती शिवसेनेच्या वाट्याला आली आहेत. तर राष्ट्रवादीकडे अर्थ, ग्रामविकाससह 13 तर काँग्रेसकडे महसूल, शिक्षणसह 15 खाती देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळात सर्वात मोठी जबाबदारी ही शिवसेनेकडून मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर टाकण्यात आली आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये अखेर खातेवाटप काल 15 दिवसांनतर झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपामध्ये शिवसेनेकडे तगडी खाती आल्याचे दिसत आहे. गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषि अशा महत्वाच्या खात्यांसह तब्बल 22 खाती शिवसेनेच्या वाट्याला आली आहेत. तर राष्ट्रवादीकडे अर्थ, ग्रामविकाससह 13 तर काँग्रेसकडे महसूल, शिक्षणसह 15 खाती देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळात सर्वात मोठी जबाबदारी ही शिवसेनेकडून मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यांच्याकडे गृह आणि नगरविकाससह तब्बल दहा खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुभाष देसाईंकडे कृषि, परिवहन, उद्योग आणि खनिकर्मसह अन्य 11 खाती देण्यात आली आहेत.दरम्यान, आता मंत्रिमंडळाचा विस्तार 23 डिसेंबर रोजी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. विस्तारामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडून इच्छुक नेत्यांची गर्दी आहे. राष्ट्रवादीतून मंत्रिपदासाठी इच्छुक अजित पवार माजी उपमुख्यमंत्री, प्रशासनावर पकड असलेला नेता, मंत्रीपदाचा मोठा अनुभव, राष्ट्रवादी पक्ष आणि आमदारांवर पकड, पण कोणतं खात मिळणार याबाबत अजून ही संभ्रम, गृहमंत्री पदाची हुलकांवणी? दिलीप वळसे पाटील माजी विधानसभा अध्यक्ष, संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव, 15 वर्ष महत्त्वाचा मंत्रीपदावर कामाचा अनुभव, पवारांचे विश्वासू, शांत स्वभावाचे हसन मुश्रीफ कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे नेतृत्व, अल्पसंख्यांक चेहरा, मंत्रीपदावर कामाचा अनुभव धनंजय मुंडे अजित पवारांचे विश्वासू, विरोधी पक्षनेते म्हणून उमटलेला ठसा, उत्तम वक्ता, बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचा पराभव करून नेतृत्व सिद्ध केलं हे ही वाचा - अखेर खातेवाटप जाहीर, सहा मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप, तगडी खाती शिवसेनेकडेच अनिल देशमुख - विदर्भातील नेते, माजी मंत्री, पवारांचे विश्वासू नवाब मलिक मुंबईतील नेतृत्व, पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ, गेले आठ वर्षे प्रवक्ता म्हणून देश आणि राज्य पातळीवर पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली, अल्पसंख्यांक समाजातील चेहरा जितेंद्र आव्हाड - पुरोगामी विचारांचा चेहरा, शरद पवार यांचे विश्वासू, ठाण्यात पक्षाचा चेहरा राजेश टोपे माजी मंत्री, अजित पवारांचे विश्वासू राजेंद्र शिंगणे बाळासाहेब पाटील मकरंद पाटील बबन शिंदे सरोज अहिरे धर्मराव बाबा आत्राम आदिती तटकरे संग्राम जगताप काँग्रेसमधील इच्छुक अशोक चव्हाण - माजी मुख्यमंत्री, प्रशासनाचा अनुभव, विविध खात्यांचा कारभार सांभाळण्याचा अनुभव पृथ्वीराज चव्हाण - माजी मुख्यमंत्री, दिल्ली आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये कामाचा अनुभव, उच्चशिक्षित यशोमती ठाकूर - काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, विदर्भातील फायरब्रॅंड नेत्या, आक्रमक महिला चेहरा विश्वजित कदम - पंतराव कदम यांचे सुपुत्र, सहकार क्षेत्रात मोठं जाळं, सांगली पुरात उल्लेखनीय काम, काँग्रेस कार्याध्यक्ष विजय वडेट्टीवार - विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, आक्रमक नेतृत्व, चंद्रपुरात पक्षाला यश मिळवून दिलं के.सी.पाडवी काँग्रेस कार्याध्यक्ष, आदिवासी चेहरा सतेज पाटील माजी मंत्री, स्वच्छ प्रतिमा, भाजप कोल्हापूर मुक्त करण्यात मोठी भूमिका, पडत्या काळात पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यात यश मिळवून दिलं वर्षा गायकवाड - दलित चेहरा, माजी मंत्री, काँग्रेसशी एकनिष्ठ घराणं, महिला नेतृत्व, मुंबईत पक्षाला स्थान मिळवून देणारा चेहरा अमित देशमुख - माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा, माजी मंत्री, लातूरमध्ये पक्षाला बळकटी देण्याचं काम सुनील केदार - विदर्भातील आक्रमक चेहरा, काँग्रेस नेतृत्वशी एकनिष्ठ, ज्येष्ठ आमदार अमीन पटेल - मुंबईतील अल्पसंख्यांक चेहरा, स्वच्छ प्रतिमा नसीम खान (निवडणुकीत हरले आहेत, पण इच्छुक आहेत) - अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय, निवडणुकीत हरले तरी इच्छुक, मुंबईतील अल्पसंख्यांक चेहरा, माजी मंत्री प्रणिती शिंदे -माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या, तिसऱ्यांदा आमदार, युवा महिला नेतृत्व