Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : ठाणे : कळवा येथील घोलई नगर भागात दरड दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, दोन जणांना वाचवण्यात यश
Maharashtra, Mumbai Rain LIVE Update : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पाऊस. काही ठिकाणी पावसाची कोसळधार, तर काही ठिकाणी तुरळक सरी.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. बोरघाटात पावणे दहाच्या सुमारासची घटना. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प, काही वेळात वाहतूक सुरू होईल अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली. युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू.
कल्याण डोंबिवली शहरात मागील 24 तासात 177 मिमी पावसाची नोंद झाली आहे . आज सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती मात्र सकाळ नंतर पावसाने जोर धरला होता आताही पावसाचा जोर कायम आहे . सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील डोंबिवली रेल्वे स्टेशन नेहरु रोड नांदिवली अहिरे रोड कल्याण पूर्वेतील कल्याण पश्चिम मधील काही सखल भागात तसेच वालधुनी परिसरातील अशोक नगर शिवाजीनगरसह अनेक सखल भागात पाणी साचलय . अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय
ठाणे : कळवा येथील घोलई नगर भागात दरड दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, दोन जणांना वाचवण्यात यश
रायगड- पाली-वाकण मार्गावरील वाहतूक बंद, अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ
रायगड : माथेरान घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प. वॉटरपाईप स्टेशन परिसरात अतिवृष्टीमुळे दरड कोसळली. पर्यटनस्थळ माथेरानला तुफान पर्जन्यवृष्टी होत असून नेरळ-माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळून वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शनिवार व रविवार विकेंडला पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते, त्याच वेळेस माथेरानमध्ये तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून माथेरानपासून दोन किमी अंतरावर वॉटर पाईप स्टेशनच्या वरच्या बाजूला अतिवृष्टीमुळे दरड कोसळलीअसून नेरळ-माथेरान घाट रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे, परतीच्या प्रवासाला असलेल्या पर्यटकांना झाला आहे. दुपारची वेळ असल्याने पर्यटक संख्या कमी होती. पावसाचा वेग जास्त असल्याने दरड काढण्यासाठी अडचणी येत होत्या.
रत्नागिरी : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी इशार पातळीवर वाहत आहे. नदीला पुरस्थीती निर्माण झाल्यामुळें खेड दापोली मुख्य महामार्गावर पुराचे पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर त्याठिकाणी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..
रायगड : उरण तालुक्यातील अनेक मार्गावर पाणी साचले. विंधणे ते दिघोडा रस्ता पाणी साचले. गव्हाण फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली. चिरनेर मार्गावर पाणी साचले. वशेणी दिघाटी मार्गावरील केळवणे रस्त्यावत पाणी साचले. उरण पनवेल मार्गावर जेएनपिटी कॉलनीजवळ रस्त्यावर पाणी साचले..
Mumbai Traffic Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावासाची बॅटिंग सुरु आहे. या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासून पावसानं अजिबात उसंत घेतलेली नाही. त्यात रस्त्यावर साचलेलं पाणी आणि खड्डे यामळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे.
Mumbai Rain : मध्य रेल्वे ठप्प होण्याच्या मार्गावर असून विक्रोळी रेल्वे स्थानकात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रुळांवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वे ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra rain : कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली असून अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. पहाटे 4 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
mumbai rain update: पुढील तासाभरात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईकरांनो अतिमहत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा
मुंबईकरांना पाणी जपून वापरायचंच आहे, त्याचबरोबर उकळून प्यावं लागणार आहे. कारण भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील यंत्रणा अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम अजूनही सुरुच आहे. त्यामुळे मुंबईत आजही कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळं भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात पाणी शिरलं होतं. त्यामळं जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा बंद करावी लागली होती.
मुसधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणा ओरडून सांगत असतानाही काही नागरिकांना याची फिकीर नसते मात्र याच बेफिकीरीमुळे काही नागरीक अनेक तास पावसात अडकून पडले होते. नवी मुंबईच्या सीबीडी भागात असलेल्या एका डोंगरातून काल तब्बल ३५० जणांची अग्निशमन दलानं सुटका केलेय. काल रविवारच्या दिवशी काही नागरीक लहान मुलांसह फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुसळधार पावसानं इथल्या ओढ्याचं पाणी वाढलं, या पाण्याचा वेग इतका भयंकर होता की नागरिकांचा परतीचा मार्गच बंद झाला. अखेरीस या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. अग्निशमन दलानं या ओढ्यात मानवी साखळी करून तब्बल 350 जणांची सुखरूप सुटका केलेय. यामध्ये अनेक लहान मुलंही होती. त्यामुळे नागरिकांनो पावसाळा आहे, नसतं धाडस करून धोका ओढवून घेऊ नका
मुसळधार पावसामुळं काल मुंबईत मृत्यूतांडव पाहायला मिळालंं... दरड आणि भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या दुर्घटनेत ३० जणांना जीव गमवावा लागला.. पावसाचं हे रौद्र रुप पाहुन मुंबईसह लगतच्या शहरांची झोप उडाली असतानाच, आज मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. तर १९ ते २२ जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तिकडे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात पाणी शिरले आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच कल्याण-डोंबिवली परिसरात हजेरी लावली सकाळपासून पावसाचे ये जा सुरू होती मात्र सायंकाळी सहा च्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावत कल्याण-डोंबिवली मध्ये एकच दाणादाण उडवून दिली कल्याण परिसरात काही रस्त्यांवर पाणी साचले दिसून आल तर डोंबिवलीत अनेक ठिकाणी पाणी साचले स्टेशन परिसर ,नेहरू रोड, आयरे गावतील काही चाळींमध्ये तसंच डोंबिवलीतील नांदिवली परिसरात तर कमरे इतकं पाणी साचलं होतं त्यामुळे घरी परतणाऱ्या नागरिकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली .पाणी साचल्यामुळे डोंबिवली नांदीवली परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता यावेळी काही तरुण नागरिकांना वाट करून देताना देखील दिसून आले.
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील राजपुरी येथे दरड कोसळली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली, तीन ते चार घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरडग्रस्त भागातील आठ कुटूंबातील 35 रहिवाशांना पसुरक्षित स्थळी हलविले आहे.
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानंतर शनिवारी रात्री पासून मुंबई ठाणे पालघर परिसरात पावसाने हाहाकार माजविला. रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागाला झोडपून काढले. भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात सायंकाळ पासून सुरू झालेली पावसाची संततधार कायम असून पाऊस सुरूच राहिल्यास शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरू शकते .तर ग्रामीण भागात दापोडे गावात गोदामांचे बांधकाम करताना नैसर्गिक नाले बुजविले गेल्याने गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे अनेक कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक घरां मध्ये पाणी शिरल्याने कुटुंबियांचे घरातील सर्व साहित्य फर्निचर पाण्याखाली गेले आहे .तर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरून भिवंडी कडे येणाऱ्या मार्गात हरिहर कंपाऊंड येथे गुडघा भर पाणी साचल्याने येथे वाहतूक कोंडी होऊन अनेक वाहने पाण्यात बंद पडल्याने ढकलत बाहेर काढावी लागत होती .
मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच भिवंडी शहरातील नदिया पार शांतीनगर परिसरातील चार ते पाच तरुण कामवारी नदीत पत्रात पोहण्याकरता गेले होते, परंतु पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे . जुनेद अन्सारी वय 20 वर्ष असे नदीपात्रात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला वाचवण्यासाठी मित्रांनी खूप प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले . मात्र स्थानिकांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा स्थानिक तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू करण्यात आली परंतु पाण्याचा प्रवाह अतिशय वेग असल्याने या पाण्यात शोधणे अतिशय कठीण होत होता तर दुसरीकडे अंधार झाल्याने सध्या शोधमोहीम थांबवण्यात आली असून उद्या पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे
चेंबूर येथील भारतनगर दुर्घटनेचे रेस्क्यू ऑपरेशन 16 तासानंतर संपले आहे.एनडीआरएफ, अग्निशमन दल, पालिका आपत्कालीन विभागाच्या जवानांनी प्रचंड पावसात देखील हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले आहे.
आज सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची ये-जा सुरू होते मात्र सायंकाळनंतर कल्याण-डोंबिवलीत पावसाने चांगलाच जोर धरला . तासभरापासून कल्याण डोंबिवली मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे . त्यामुळे डोंबिवली स्टेशन परिसरात ,नेहरू रोड भाजी मार्केट परिसरात , गुडघाभर पाणी साचले होते . तासाभराच्या पावसात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेने केलेल्या नालेसफाई व गटारे सफाईचा दाव्याची मात्र चांगलीच पोलखोल झाली .
कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प,
मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली,
दरड कोसल्याने कोल्हापूरहून रत्नागिरी कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प,
गगनबावडा पोलीस घटनास्थळी दाखल,
करूळ घाटातही रस्ता खचल्याने वाहतुकीसाठी 26 जुलै पर्यंत यापूर्वीच बंद करण्यात आला,
मुंबईतल्या पावसाने सतत खोळंबणाऱ्या रेल्वेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी घोषणा.. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण स्वतः रेल्वेने प्रवास करून रेल्वे हद्दीतील नालेसफाई आणि इतर समस्यांचा आढावा घेणार..
स्वतः लोकलने प्रवास करणार रेल्वे राज्यमंत्री
Maharashtra Rain LIVE Updates : चेंबूरमधील दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू, मंत्री आदित्य ठाकरे घटनास्थळी, खासदार राहुल शेवाळे, मंत्री नवाब मलिक यांनीही घटनास्थळी भेट दिली #MumbaiRains #Mumbai
चेंबूरमध्ये दरड कोसळून झालेल्या घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून झालेल्या घटनेत सात जणांचा मृत्यू
Maharashtra Rain LIVE Updates : मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा, पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची पंतप्रधान मोदींची घोषणा #MumbaiRains #Mumbai
https://marathi.abplive.com/news/maharashtra-rain-live-update-imd-weather-alerts-mumbai-konkan-and-goa-says-imd-heavy-rainfall-news-on-18th-july-2021-995011
कुर्ला, सायन दरम्यान पाणी भरलेले भरल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली होती. मात्र पाऊस थांबल्याने पाणी ओसरत असून ट्रॅक मोकळे होत आहेत. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मात्र हार्बर मार्ग अजूनही बंद असून केवळ मानखुर्द ते पनवेल वाहतूक सुरू आहे.
रात्रीच्या मुसळधार पावसामुळे भांडुप पंपिंग स्टेशन मध्ये पाणी तुंबलं असून हे पाणी उपसण्याचे काम सध्या सुरू आहे. मुंबईत आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा झाला नाही. मुंबईला ज्या धरणांतून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या सर्व धरणांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलात करुन पुढे मुंबईकरांना पुरवठा केले जाते. मुंबईला दरदिवशी 3800 दशलक्ष लिटर पण्याचा पुरवठा केला जातो.
रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार नालासोपारा भागात पाणीच पाणी साचलं आहे. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आता साडे दहा वाजले तरी पाणी ओसरण्याच नाव घेत नाही. रात्री अचानक पाणी साचलं, त्यामुळे कारखानदार, दुकानदार, तळ मजल्यावरील अनेक घरात अचानक पाणी आलं. त्यात सर्व जण झोपेत असल्याने समान वाचवण्यासाठी कुणालाही वेळच मिळाला नाही. मोठया प्रमाणात नागरीकांचं नुकसान झालं आहे.
पालघर जिल्ह्यात रात्री अचानक झालेल्या विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सफाळे पालघर बोईसर डहाणू तलासरी तालुक्यात अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. बोईसर पालघर डहाणू भागातील अनेक रस्ते बंद झाले असून शहरांशी संपर्क तुटला आहे तर डहाणू मध्ये बस डेपो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. इराणी रोड सागर नाका येथील रस्त्यांवर ती मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाचं पाणी सोडल्यामुळे गुजरात मधील उंबरगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरले आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी रात्री विजांच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली होती,,त्यामुळे डहाणू बोईसर पालघर चिंचणी भागात काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं तर बोईसर पालघर रोडवरील नवीन मुख्यलया जवळील नाल्याला पूर आल्याने रस्ता बंद झाला आहे,,अनेक ठिकाणी अजूनही पुराचे पाणी साचले आहे
कांदिवली पूर्व येथे दरड कोसळल्यामुळे बस मार्ग क्रमांक 289 चे प्रवर्तन दामू नगर बस स्टेशन पर्यंत खंडित करण्यात आलेले आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी रात्री विजांच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे डहाणू, बोईसर, पालघर, चिंचणी भागात काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होत तर बोईसर पालघर रोडवरील नवीन मुख्यलयाजवळील नाल्याला पूर आल्याने रस्ता बंद झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही पुराचे पाणी साचले आहे.
मुंबईसह परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ, पश्चिम रेल्वे, मुंबई विभागातील सर्वच रेल्वे स्टेशनला अनेक रेल्वे गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद मार्गाने आलेल्या नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, सिकंदराबाद- मुंबई देवगिरी एक्सप्रेस, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस या गाड्या नाशिक जिल्ह्यात थांबवण्यात आल्या आहेत.
मुंबई सह ठाणे व इतर अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरु आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ , पश्चिम रेल्वे, मुंबई विभागातील सर्वच रेल्वे स्टेशनला अनेक रेल्वे थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद मार्गाने गेलेल्या नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस, नांदेड मुंबई राज्यराणी, या देखील नाशिक जिल्ह्यात उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मिठी नदी धोक्याच्या पातळीच्या खूप वर गेली 3.3 मीटर अशी धोक्याची पातळी आहे. मात्र आता मिठी नदीचे पाणी 4.2 झाले आहे, म्हणजे ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर खाली केले जात आहे. सर्व कुटुंबाना पालिकेच्या शाळांमध्ये नेले जात आहे.
रेल्वे सेवेवरही पावसामुळे परिणाम झाला असून सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain LIVE Update : मुंबई (Mumbai) आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून अनेक भागांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. सीएसटीएम वरुन जाणाऱ्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे.
मुंबईतील दादर, परळ परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोबतच दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पुढील काही तासात मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आयएमडी मुंबईने काल रात्री साडे बारा वाजता जाहीर केलं होतं. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे.
रेल्वे सेवेवरही पावसामुळे परिणाम झाला असून सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.
मिठी नदी धोक्याच्या पातळीच्या खूप वर गेली 3.3 मीटर अशी धोक्याची पातळी आहे. मात्र आता मिठी नदीचे पाणी 4.2 झाले आहे, म्हणजे ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे पालिकेने आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला येथील क्रांती नगर खाली केले जात आहे. सर्व कुटुंबाना पालिकेच्या शाळांमध्ये नेले जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -