Maharashtra Breaking LIVE Updates: पुण्यात बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Maharashtra Breaking 9th August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
मुंबईतील हिजाबबंदीच्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
मुंबईतील महाविद्यालयांनी हिजाबबंदीचा निर्णय घेतला होता
त्यात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता
सर्वोच्च न्यायालयाने मात्र हिजाबबंदीला स्थगिती दिली असून विद्यार्थिनींना परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली
पुणे
पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रन
भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास फरफटत नेले
ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली
चारचाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे
घटनेच्या थरारक व्हिडिओ समोर
सध्या तो तरुण गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत
नवी दिल्ली -
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ३ दिवसाचा महाराष्ट्राचा झंझावाती दौरा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व
१६,१७ आणि १८ ऑगस्ट रोजी शाह महाराष्ट्र दौऱ्यावर
६ विभागाचा असणार दौरा
भाजप पदाधिकाऱ्यांशी विभागवार करणार चर्चा
पुणे : बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न...
बार्टी 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांनी 50 टक्के अधिछात्रवृत्ती देणाऱ्या निर्णयाविरोधात केला आत्मदहनाचा प्रयत्न...
बार्टी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला...
पाच ऑगस्टपासून विद्यार्थ्यांचं बार्टी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे...
सरकार 'लाडकी खुर्ची योजना', यासाठी दिल्ली दरबारी लोटांगण घालतायेत - अमोल कोल्हे
लाडकी खुर्ची योजना सुरू आहे, या लाडकी खुर्ची साठी वाट्टेल तितकी लोटांगणं घालण्याची तयारी या महायुतीने ठेवली आहे. यासाठी दिल्ली दरबारी दौरे सुरुयेत. त्यामुळं आता आपल्याला स्वाभिमान जागवणारे सरकार आपल्याला राज्यात आणायचं आहे. त्यासाठी ही 'शिवस्वराज्य यात्रा' आपण काढतोय, असे अमोल कोल्हे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे - नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठाणे- नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

पुणे पुण्यात कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून..
पुण्यातील रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून
राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड..
राजू शिवशरण खून प्रकरणात वानवडी पोलिसांनी घेतलं पाच संशयिताना ताब्यात
मध्यरात्रीच्या सुमारास रामटेकडीतील राजू शिवशरण्याचा पाठलाग करून केला खून..
पुणे
पुण्यात शेतकऱ्यांच्या ट्रॕकर मोर्चा
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मोर्चा
दुध, उस इतर पिकांना हमीभाव देण्याच्या मागणीसाठी मोर्चा
उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर देण्याची मागणी
आमदार खासदारांची पेंशन बंद करून ते पैसे आत्महत्याग्रस्त कुटूंबांना देण्याची मागणी
पुण्यातील विधानभवनावर मोर्चा धडकणार
भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेचा मोर्चा
केशव उपाध्ये यांची महाविकासस आघाडीवर टीका
मागील तीन दिवस दिल्लीत मविआच्या बैठका सुरू होत्या
तीन दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते
तीन दिवस जात्यावरचे दळण सुरू होते
मात्र यातून रस आलाच नाही...महाविकास आघाडी कोरडे चीपाट आहे
तीन दिवसात दळण केले पण पीठ आलेच नाही कारण मविआ फक्त दगड टाकले होते
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी तीन दिवस केलेली हुजरेगिरी होती
पण त्याला देखील यश आलेले नाही
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
मुख्य आरोपी भावेश भिंडेला दिलासा नाहीच
भिंडेनं आपल्याविरोधातील गुन्हा रद्द करत जामीनासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली
होर्डिंग कोसळणं हा अॅक्ट ऑफ गॉड असल्याचा भिंडेचा याचिकेतून अजब दावा
तसेच परराज्यातून अटक करताना मुंबई पोलिसांनी कायद्याचं पालन केलेलं नसल्याचाही भिंडेनं केला होता दावा
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पॅरिसमध्ये भारतीय खेळाडू जिवाची बाजी लावून पदकांसाठी प्रयत्न करत आहेत. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घडामोडींची प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -