Maharashtra News Live Updates 23 Sep 2024: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, एका क्लिकवर...

Maharashtra News Live Updates 23 September 2024: राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 23 Sep 2024 01:58 PM
नांदेडमध्ये मराठा आंदोलक-पोलिसांमध्ये हुज्जत, मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी

- नांदेड मध्ये मराठा आंदोलक पोलिसांमध्ये हुज्जत, मराठा समाजाच्या वतीने आज नांदेडमध्ये देण्यात आली आहे बंदची हाक
- राज कॉर्नर परिसरात पोलिसांनी मराठा समाजाची बाईक रॅली अडवली अडवली
- राजकारण परिसरात मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी.
- मराठा कार्यकर्ते पोलीस आमने-सामने.
- छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यापासून निघाली होती बाईक रॅली.

मराठा आरक्षणाबाबतच्या उपसमितीची आज महत्त्वाची बैठक

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपसमितीची आज महत्वाची बैठक


सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी २ वा होणार बैठक


बैठकिला उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाईसह कायदेतज्ञ राहणार उपस्थित


हैद्राबाद गॅजेटची प्रत सरकारला उपलब्ध झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रीया कशी राबवावी यावर चर्चा होण्याची शक्यता...

बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना धमकावत मारहाण करणाऱ्या मनसे शहर प्रमुखाला पोलिसांकडून अटक

बीडच्या जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना धमकावून मारहाण करणाऱ्या मनसे बीड शहर प्रमुखाला शहर पोलिसांनी अटक केली. जिल्हा रुग्णालयात दुचाकी अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला उपचार मिळत नसल्याचे कारण देत मनसे शहर प्रमुख करण लोंढेसह त्याच्या सहकार्याने मारहाण केली. याचीच गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून आरोपी करण लोंढेला अटक केली. ऋतिक टाकळकर याचा बीड शहरात दुचाकी वर अपघात झाला होता. याच दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांकडून वेळेत उपचार न मिळत असल्याचं कारण देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी डॉकटराला मारहाण केली. याच प्रकरणात बीड पोलिसांनी करण लोंढे याला अटक केली आहे. 

परळीत धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको

पंढरपूर लातूर नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर जमातीच्या उपोषणा कार्यकर्त्यांना पाठिंबा म्हणून परळी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी केलेल्या रस्ता रोको मूळ कही काळ परळी बीड आणि परळी परभणी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली होती..यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव मध्ये रस्ता रोको मध्ये सहभागी झाले होते
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला

सोलापुरात धनगर समाज आक्रमक, सोलापूर तुळजापूर महामार्ग रोखला 

सोलापूर ब्रेकिंग 
=


सोलापुरात धनगर समाज आक्रमक, सोलापूर तुळजापूर महामार्ग रोखला 


एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज उतरला रस्त्यावर 


सोलापुरातील तुळजापूर नाका या ठिकाणी धनगर समाजाचा रस्ता रोको सुरू 


सोलापूर - तुळजापूर महामार्ग धनगर समाजाने रोखून धरला

मुस्लिम धर्म विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जलिल यांच्याकडून तिरंगा रॅलीचे आयोजन 

मुस्लिम धर्मविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे व रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी AIMIM पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लिम धर्मा विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विविध ठिकाणी 58 गुन्हे दाखल असून देखील पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांना संविधान पत्र देण्यासाठी तसेच लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे 


संभाजीनगर येथून इम्तियाज झालेली यांचा ताफा निघाला असून समृद्धी महामार्ग कसारा परिसरात येणार असून भिवंडी ठाणे मुंब्रा परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना कसारा मध्ये एकत्र बोलवण्यात आले असून कसारा पासून मुंबई नाशिक महामार्गाने मुंबईकडे रवाना होणार आहेत. या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने वाहन मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नाव बदलणार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं नामकरण करणार

पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नाव बदलणार


जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे अस नामकरण करणार


आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत होणार निर्णय


दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली होती मोठी घोषणा


या घोषणेनंतर तात्काळ आजच्या मंत्रीमंडळ बैठकीच्या समोर हा प्रस्ताव


आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेऊन केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवला जाणार


आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढाव्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम आज झारखंडमध्ये

नवी दिल्ली -


विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढाव्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम आज झारखंडमध्ये


आज आणि उद्या असा दोन दिवसांचा टीमचा झारखंड दौरा


या दौऱ्यात टीम राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार असून तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून घेणार 


झारखंड आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सोबत होणार असल्याने तयारी किती झालीय त्याचा आढावा घेतला जाईल


याच आठवड्यात टीम महाराष्ट्राचा देखील दौरा करणार आहे


दोन्ही राज्यांचा दौरा झाल्यानंतर पुढील महिन्यात पहिल्या पंधरा दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी आता पुन्हा महाराष्ट्र स्टुडंट यूनियनची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी आता पुन्हा महाराष्ट्र स्टुडन्ट यूनियनची सर्वोच्च न्यायालयात धाव


मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र सोडून युनियन सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान


शनिवारी निवडणुकीची स्थगिती उठवण्यासाठी युवा सेनेने दाखल केलेल्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 24 सप्टेंबरला निवडणूक आणि 27 सप्टेंबरला मुंबई सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याचे दिले आहेत निर्देश


 मात्र निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आणि सिनेट निवडणूक व्यापक स्वरूपात व्हावी यासाठी पुन्हा मतदार नोंदणी व्हावी, यासाठी  24 तारखेला होणाऱ्या सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्याची महाराष्ट्र स्टुडन्ट युनियन (याचिकाकर्त्यांची) मागणी


 सिनेट निवडणुकी संदर्भात आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री 'धर्मजागरण यात्रा' काढली जाणार

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री 'धर्मजागरण यात्रा' काढली जाणार


धर्मजागरण यात्रेच्या माध्यमातून खेडोपाड्यातील वाडी,वस्तीवर जाऊन शिवसेना अध्यात्मिक सेनेचे  पदाधिकारी करणार प्रचार


कोल्हापूरातल्या अंबाई देवस्थानात दर्शन घेऊन या यात्रेला सुरूवात केली जाणार असल्याची  सूत्रांची माहिती


गावोगावी महाराष्ट्रातील वासुदेव, गोंधळी याद्वारे पारंपारिक लोककला महत्वाच्या ग्रामयात्रा तथा दिंडी, हिंदुत्ववादी संघटना समावेत पदयात्रा काढून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचा शिवसेनेचा राहणार प्रयत्न


डाॅ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच यात्रेला महाराष्ट्रात सुरूवात केली जाणार

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविणाऱ्या गणपती मंडळांवर पुणे पोलिसांकडून कारवाईला सुरुवात 

पुणे 


पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविणाऱ्या गणपती मंडळांवर पुणे पोलिसांकडून कारवाईला सुरुवात 


धनकवडी परिसरात दोन गणपती  मंडळांवर गुन्हे दाखल 


मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केल्या प्रकरणी सहकार नगर पोलिसांकडून दोन मंडळविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल 


अखिल गुरूदत्त तरुण मंडळ , शिवतीर्थ मंडळाचे अध्यक्ष आणि डीजे चालकावर गुन्हा दाखल 


दोन्ही मंडळांनी कोणतीही परवानगीदेखील घेतली नसल्याची पोलिसांची माहिती


पुण्यातील याच नाहीतर बाकी मंडळवारदेखील कारवाई होण्याची शक्यता

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोहजवळ खासगी बसचा अपघात...

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खासगी बसचा अपघात...


आज सकाळी 8 वाजताची घटना...


मेळघाट मधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लगतच्या पुलाखाली कोसळली...


या अपघातात 30 ते 40 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक..


सर्व जखमी प्रवाशांवर लगतच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक 

आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काहीच वेळात मनसेची बैठक 


मनसे नेते यायला सुरवात झाली आहे 


मनसे नेते आणि निरीक्षक यांनी राज्यातील विधानसभा निवडणूक दृष्टीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये आढावा घेत चाचपणी केली आहे


मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे नेते आणि नेमलेले निरीक्षक यांच्याकडून राज्यातील विधानसभा निहाय आज आढावा घेतील 


तसेच राज ठाकरे आगामी काळात पुढील दौऱ्याविषयी निर्णय घेण्याची शक्यता आहे 


काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा दौरा केला होता. 


यानंतर आता महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये आणि विदर्भातील काही भागात पुन्हा आगामी काळामध्ये दौरा करणार आहेत.


 मनसे विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघांमध्ये मनसेची जोरदार तयारी सुरू आहे

संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्ष बनवल्यानंतर भरत गोगावले नाराज?

संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्ष बनवल्यानंतर भरत गोगावले नाराज?


अंबरनाथच्या मेळाव्यात भरत गोगावले यांनी मंत्रीपद दिलं नाही, तर एक नेता राजिनामा देणार होता असं केलं विधान 


कदाचीत मुख्यमंत्री यांनी त्यांना सिडकोचं चेयरमन केलंय असं केलंय विधान


पुढच्या सरकारमध्ये दोघेही मंत्री असू असंही केलंय विधान 


सूत्रांची माहिती सिडकोचं चेयरमन पद भरत गोगावलेंनी मागितलं होतं. पण ते त्यांना न देता, शिरसाठ यांना दिले.व एसटी महामंडळ गोगावलेंना दिल्यानं ते नाराज असल्याची माहिती 


त्यातूनच अंबरनाथ येथील मेळाव्यामध्ये आपली खदखद त्यांनी बोलून दाखवली

नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा, आमदार विकास ठाकरे यांची मागणी

नागपूर - “नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा” आमदार विकास ठाकरे आपल्या वक्तव्यावर ठाम


- “विदर्भात लोकसभेत कॅाग्रेसच्या जास्त जागा आल्या, विधानसभेतंही जास्त जागा आल्यास नाना पटोले यांचा मुख्यमंत्री पदावर पहिला अधिकार”


- “विदर्भात कॅाग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्यास, मुख्यमंत्रीपद खेचून आनू”


- नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी विदर्भातील आमदार हायकमांडला भेटणार


- “महाविकास आघाडीत मी कॅाग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोललो”


- कॅाग्रेसचे नागपूर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा दावा

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील हीच निवडणूक लक्षात घेता सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायत. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. या राजकीय क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीचा तसेच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.