Palghar Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जणजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यात काल सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून कंक्राडी नदीला पूर आल्याने डहाणू स्टेशन परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं कार गेली वाहून, एकाचा मृत्यू
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झालं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंक्राडी नदीला पूर आल्याने डहाणू स्टेशन परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर चिंचणी वाणगाव रोडवर चालकाला वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं कार वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता
देशभरासह राज्यात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला (Monsoon Update) सुरुवात झाली आहे. या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Rain) अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी नागरिकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागतोय. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, पावसामुळे वाहतूक कोंडी, मार्गावरती पाणी, डोंगराळ भागांत दरड कोसळण्याचा धोका, नद्यांना आलेला पूर पाहून नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळं अनेक भागात शाळांना सुट्टी
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि वाहतूक सेवांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: