CSK vs RCB IPL 2025: शेफर्ड आणि आयुष, बंगळूर मध्ये धावांचा पाऊस काल झालेल्या चेन्नई विरुद्ध बंगळूर सामन्यात धावांचा पाऊस पडला..बंगळूर मध्ये कधी कधी या महिन्यात मेघ गर्जना होते...पण काल शेफर्ड आणि आयुष यांची गर्जना झाली...या सामन्यात तब्बल चोवीस षटकार मारले गेले..त्यात  विराट, शेफर्ड आणि आयुष या दोघांनी मिळून १६ षटकार मारले...

नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय विराट , बेटहेल आणि शेवटी शेफर्ड यांच्या फलंदाजी मुळे चेन्नई संघाच्या अंगलट आला...सलामीला येऊन विराट आणि बेट हेल या दोघांनी ९७ धावांची सलामी दिली..त्यात दोघांनी फटक्यांची मुक्तपणे उधळण केली...आज बेट हेल त्याच्याविषयी अपेक्षा वाढवून गेला. ..त्याच्या भात्यात सर्व फटके आहेत ...आणि आज तो ते सर्व फटके खेळला..तो चेंडू सुंदर कट करतो.. ड्राईव्ह करतो..आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल करतो ..आणि रिव्हर्स स्वीप देखील करतो..त्याच्या जोडीला विराट सुद्धा आज अधिक आक्रमकतेने खेळला..त्याने आज पाच षटकारांची बरसात केली..त्यात नेहमीप्रमाणे त्याचा आवडीचा बॉटम हॅण्ड फ्लिक होता...२०/२० चषक आपण जिंकल्यावर रवींद्र जडेजा,विराट आणि रोहित या तिघांनी निवृत्ती घेतली पण या स्पर्धेत ही तिघे जण तुफान खेळ करीत आहेत..विराट ने आज सुद्धा आपले अर्धशतक झोकात पूर्ण केले..विराट आणि बेट हेल बाद झाल्यावर बंगळूर संघाची मधली फळी अपयशी ठरली तेव्हा धावसंख्या कमी होते की काय असे वाटू लागले...पण १९ व्या षटकात  शेफर्ड ने कॅरेबियन दणका दिला..त्याने खलील च्या षटकात तब्बल ३३ धावा लुटल्या...आणि नंतर  पतीराणा याच्या षटकात २१ धावा वसूल करून आय पी एल स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक पूर्ण केले..आज त्याने पतीराणा याच्या षटकात जे तीन षटकार मारले त्यातील २ त्याने यॉर्कर वर खणून काढले आणि एक वाईड यॉर्कर  वर बनविला...त्याने काढलेल्या १४ चेंडूत ५३ धावा शेवटी निर्णायक ठरल्या...

२१४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या चेन्नई संघाने आश्वासक सुरुवात केली..रशीद आणि करन लवकर बाद झाला पण आज मुंबईकर आयुष ने कमाल केली...त्याची बॅकलिफ्ट,त्याचा पुल..आणि भुवि ला  कव्हर पॉईंट वर जो षटकार मारला तो पाहून   रोहित शर्मा ची झलक दिसली...तो मुंबईकर आहे. ..त्यामुळे वेगवान गोलंदाजी खेळण्याचे त्याचे कौशल्य आहेच...पण गोलंदाज पुढील चेंडू काय टाकणार आहे हे सुद्धा त्याला ओळखता येते..आज त्याने भुवि च्या एकाच षटकात २६ धावा वसूल केल्या...त्याने पूल मारले . फ्लिक मारले..त्याने काढलेल्या  ९४ धावत ५ षटकार होते... एनगीडी शा गोलंदाजीवर एक मोठा फटका खेळताना तो बाद झाला...पण १७ वर्षाचा हा तरुण मराठी मुंबईकर आज सर्वांची मने जिंकून गेला.. या मोठ्या व्यासपीठावर त्याचे शतक सहा धावांनी हुकले...त्याच्या आजच्या खेळीला विजयाचे कुंकु लागले असते तर बरे झाले असते...त्याने रवींद्र जडेजा सोबत ११४ धावांची भागीदारी केली...जडेजा ज्या प्रकारे चौथ्या क्रमांकावर येऊन खेळला त्यावरून त्याचे फलंदाजातील कौशल्य समजून येते..तो वेगवान गोलंदाजी सहज खेळतो...आणि त्याच प्रकारे तो फिरकी गोलंदाजी सुद्धा खेळतो..तो आज ४५ चेंडूत ७७ धावा काढून नाबाद राहिला..

चेन्नई संघाचा विजय बंगळूर संघाच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे सोपा झाला होता...या स्पर्धेला जणू काही सोपे झेल सोडण्याचा शाप आहे की काय असे वाटू लागले आहे....थर्ड मॅन वर रवींद्र जडेजाचा सोपा झेल एनगीडी याने सोडला...आणि शेवटच्या षटकात तसाच सोपा झेल विराट याने सोडला...जर हा सामना चेन्नई संघाने जिंकला असता तर पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या असत्या. ब्रेव्हिस याला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त होता..सलग तिसऱ्या दिवशी पंचांचा हा वादग्रस्त निर्णय आहे.रोहित ने घेतलेला वेळ, शुभमन ने अभिषेक साठी घेतलेला रिव्ह्यू आणि आजचा निर्णय ...नितीन मेनन हे मोठे पंच आहेत...ज्या चेंडूवर त्यांनी ब्रेव्हिस याला बाद दिले तो चेंडू खूप बाहेर होता..आणि त्यांनी ब्रेव्हिस याला रिव्ह्यू घेण्यास मनाई केली.रोहित साठी एक न्याय आणि ब्रेव्हिस साठी वेगळा असे नाही होऊ शकत..या अशा गोष्टीमुळे ही स्पर्धा विश्वासार्हता गमावून बसेल...आज यश दयाळ याचे कौतुक करावे लागेल...समोर धोनी..जडेजा आणि शिवम असताना सुद्धा त्याने शांत डोक्याने गोलंदाजी केली..त्यात त्याचा एक चेंडू नो बॉल पडला होता...तरी सुद्धा त्याने तीन चेंडूत ६ धावा दिल्या नाहीत. .रिंकू सिंग याने २९ धावा काढल्यावर यश टीकेचा धनी ठरलं होता...आज त्याने १४ धावांचे रक्षण करून विजय मिळवून दिला...आज बंगळूर संघाने १६ गुणांसहीत अव्वल होण्याचा पराक्रम करून इतर संघांना धडकी भरवली आहे..इथून पुढे मुंबई..पंजाब..दिल्ली  गुजरात या संघाना एक सुद्धा पराभव त्यांना या स्पर्धेबाहेर करू शकतो... प्ले ऑफ च्या या शर्यतीत गुजरात आणि मुंबई जर बाहेर पडली..तर ही स्पर्धा नवीन विजेता मिळवून देईल...अक्षर..श्रेयस..रजत  या पैकी एक कदाचित नवीन इतिहासाचा साक्षीदार ठरू शकेल...फक्त मुंबई संघासाठी लॉ ऑफ एव्हरेजेस लागू झाला तर....

हा लेखही वाचा:

GT vs SRH IPL 2025: फटक्यांचे प्रदर्शन, गिल, बटलर, अभिषेक, सुदर्शन