वाशिम : वाशिम जिल्ह्यातील सर्वात जुनी बाजार समिती कारंजा येथे शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे या बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याच ठरत आहेत. पहिला निर्णय आहे बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 5 रुपयात पोट भरून जेवण आणि दुसरा निर्णय म्हणजे बाजार समितीमध्ये माल आणणाऱ्या शेतकऱ्यांना कूपन दिल्या जातात. या कूपनचा लकी ड्राद्वारे वर्षातल्या शेवटी विविध इनामी योजना आखली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकरी आनंदित आहेत.


वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील पहिली बाजार समिती आहे. या बाजार समितीची स्थापना 1886 मध्ये झाली. पूर्वी याठिकाणी कापसाच खूप मोठा व्यापार होता. मात्र, आता दिवसेंदिवस शेती तोट्यात जात असल्याने शेतकरी आता पारंपारिक पिकांनाच पसंती देतात. त्यातही पिकवलेला माल योग्य भाव आणि तातडीने घेतल्याही जाऊ शकत नाही. सध्या नाफेडद्वारे तुरीची खरेदी अनेक ठिकाणी बंद झाली आहे. त्यामुळे आठवडा भर शेतकऱ्यांना आपल्या मालाची रखवालगिरी करावी लगत आहे. घरून डब्बा नाही आला की अनेक शेतकरी उपाशी झोपतात. मात्र, कारंजा बाजार समितीत नाफेडची खरेदी सुरु आहे. पण धीम्या गतीने ज्यामुळे शेतकऱ्यांना पाच ते सहा दिवस बाजार समितीत थांबावे लागते, अश्यावेळी दोन वेळा बाहेर जेवणासाठी जायचं म्हटल की २०० ते २५० रुपये लागतात. पण बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी यावर्षी दोन महत्वाचे निर्णय घेतले आहे.

5 रुपयांत पोटभर जेवण

पहिला निर्णय आहे जो शेतकरी बाजार समितीत माल विकायला आणेल त्याला बाजार समितीमध्ये केवळ ५ रुपयात पोट भरून जेवण मिळेल. यासाठी बाजार समिती स्वत:चे 25 आणि शेतकऱ्यांचे 5 असे 30 रुपयांचं जेवण अवघ्या पाच रुपयात शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी आनंदित याठिकाणी जेवण करत आहे. या जेवणामध्ये शेतकऱ्यांना भाजी, पोळी, वरण, भात, पोळी आणि ठेचा दिल्या जाते. याठिकाणी दररोज 400 ते 500 शेतकरी अवघ्या पाच रुपयात पोट भरून जेवण करत आहे.

इनामी योजना

दुसरा निर्णय आहे बाजार समितीचा, तो आहे इनामी योजना. जानेवारी 2017 पासून जो शेतकरी बाजार समिती माल आणेल त्याला एक कूपन दिल्या जातील आणि वर्षातून एकदा लकीड्रॉ होईल, ज्यामध्ये पाहिले बक्षीस आहे मोठं टॅक्टर आणि सोबतच मिनी टॅक्टर. त्याचसोबत विविध शेतीउपयोगी साहित्याच बक्षीस लकीड्राद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे कारंजा बाजार समिती ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याच संचालक मंडळ सांगतात.

सध्या वाशिम जिल्ह्यात अनेक बाजार समितीमध्ये नाफेडची तूर खरेदी बंद आहे. ज्यामुळे मागील 10 ते 12 दिवसांपासून अनेक शेतकरी बाजार समितीतच दिवस रात्र काढत आहे. तर काही शेतकऱ्यांना उपाशी झोपावं लागतं. अशावेळी तरी बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहावे तस मात्र कुठ दिसत नाही. कारंजा बाजार समितीने सुरु केलेली 5 रुपयात पोट भरून जेवण, ही तरी सुरु केली तर नक्कीच शेतकरी थोड्या प्रमाणात का होईना पण तो नक्कीच बाजार समितीची स्तुतीच करेल.