लातूर : मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha ) यांनी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गळ्यात हात घालुन फिरा... 24 डिसेंबर नंतर कळून येईल राज्यातील तरुण कोणा बरोबर आहे, असा पटलवार मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लातूर येथे केला.  अंतरवली सराटीच्या (Antarwali Sarathi) घटनेत फडणवीस यांचा काही हात नव्हता, त्यांच्यावर टीका झाली. तरी ते शांत राहिले, असे वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले होते. त्यावर लातूरमध्ये जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. आमचा अंत पाहू नका, 24 डिसेंबरनंतर तुम्हाला राज्यातील तरुण कुणासोबत आहे, हे समजेल, असे जरांगे पाटील म्हणाले. 


फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे भीष्म - मंगलप्रभात लोढा


महाभारतातील अर्जुन, कृष्ण यांच्याबद्दल आपण सर्व काही जाणतो, मात्र प्रचंड सहनशीलता असलेल्या भीष्म पितामह बद्दल फार जाणत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात भीष्म सारखीच सहनशीलता असलेले नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस. अंतरवली सराटीच्या घटनेत खोटे आरोप होऊनही ते शांत राहिले.ते सहनशील म्हणून तरुण त्यांच्या पाठीशी आहेत, असे वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नागपुरातील रोजगार मेळाव्यात केले होते.  


 अंतरवली सराटीच्या घटनेत फडणवीस यांचा काही हात नव्हता, हे RTI मध्येही सिद्ध झाले आहे. तरी फडणवीस यांच्यावर आरोपांचा भडीमार होत आहे.तरीही ते शांत राहिले. सत्ता गमावलेले नेते सतत फडणवीस यांच्याबद्दल चुकीचा प्रचार करत होते, फेसबुकवर खोटा प्रचार करून बदनामी केली जात होती, तरी फडणवीस शांत राहिले.. त्यांनी फक्त विकासाचे काम सुरू ठेवले.फडणवीस तुम्ही शांत राहिले तरी तरुणशक्ती शांत बसणार नाही.ती तुमच्या सोबत उभी राहणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या वर जोरदार टीका केली आहे . 


जरांगे पाटलांचा लोढांच्या वक्तव्यावर पलटवार - 


फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे भीष्म, या मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली.  24 डिसेंबर 2023 नंतर लक्षात येईल की राज्यातील तरुण कोणाबरोबर आहे. आमचा अंत पाहू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथे दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची आज जांब जळकोट येथे जाहीर सभा होती. या सभेत त्यांनी लोढांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.


जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ?


मनोज जरांगे पाटील यांनी मंगल प्रभात लोढा यांच्यावर जोरदार टीका केली...फडणवीस यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या गळ्यात हात टाकून फिरावे.फक्त 24 डिसेंबरनंतर लक्षात येईल.त्यांनी शब्द दिला आहे. वेळ मागितला आहे. आम्ही दिला. त्यांचा शब्द त्यांनी पाळावा. त्यांच्या मताला आम्ही मान दिला आता त्यांनी दिलेला शब्द पाळवा, असे जरांगे पाटील म्हणाले.