Latur Rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणावत आहे तर कुठे अवकाळी पाऊस ( (Unseasonal rain)  हजेरी लावत आहे. मागील आठ ते दहा दिवसापासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, लातूर (Latur) जिल्ह्यातही अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.


Rain : अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत 


दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार लातूर जिल्ह्यातील लातूर शहर,औसा, निलंगा, वलांडी परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. वाऱ्यामुळं अनेक ठिकाणच्या लाईट गुल झाली आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते. त्यानंतर दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळं उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं जिल्ह्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.


Agriculture Crop : शेती पिकांना मोठा फटका 


सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. 


IMD : आजही राज्यात काही भागात अवकाळी पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळं शेतकरी मात्र, चांगलेच हवालदिल झाले आहेत. कारण हाती आलेली पिकं या पावसामुळं वाया जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे सहा दिवसात 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान, कांदा पिकाला सर्वाधिक फटका