Latur Train Accident : लातूरमध्ये (Latur) दोन वेगवेगळ्या रेल्वे अपघातात (Train Accident) दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन तासांच्या फरकाने हे अपघात झाले. पहिली घटना लातूर शहरात घडली तर दुसरी घटना रायवाडीजवळ घडली.


मालगाडी (Goods Train) आणि पॅसेंजर रेल्वेने (Passenger Train) दिलेल्या धडक दिल्याने हा अपघात झाला. या दोन्ही घटना दोन तासांच्या फरकाने घडल्या आहेत. यामध्ये महादेव मनोहर कापले आणि मुबारक फारुख शेख या दोघांचा मृत्यू झाला. महादेव मनोहर कापले हा पुणे जिल्ह्यातील अंळदी इथला आहे. तर मुबारक फारुख शेख हा रेणापूर इथला असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पहिली घटना कशी घडली?
पहिल्या घटनेत लातूर रेल्वे स्थानक इथून कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या मालगाडीने रायवाडी शिवारात एका तरुणाला जोरात धडक दिली. यामध्ये 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री  घडली. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या खिशात आधार कार्ड आढळून आलं आहे. त्यावर महादेव मनोहर कापले (वय 25 वर्षे रा. आळंदी, जिल्हा पुणे) असं नमूद करण्यात आलं आहे.


दुसरी घटना कशी घडली?
तर दुसऱ्या घटना रायवाडीजवळ घडली आहे. नवीन रेणापूर नाका इथल्या उड्डाणपुलाखाली लातूर रोडकडून लातूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघालेल्या रेल्वेने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. या मृताची ओळख पटली असून, मुबारक फारुख शेख (वय 38 वर्षे, रा. आरजखेडा ता. रेणापूर) असं या मृत व्यक्तीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत लातूर इथल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.