लातूर: जिल्ह्यातील 'पास ऑन'  उपक्रमची जोरदार चर्चा आहे. आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने 76 सायकलचे वाटप करण्यात आले आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांना या सायकलचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, या सायकल जरी विद्यार्थी वापरत असतील, पण यावर ताबा शाळेचा असणार आहे. त्यामुळे, विद्यार्थी बदलतील मात्र सायकल पुढे 'पास ऑन' होऊन, इतर विध्यार्थ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध राहतील. 


ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाळेत जाण्यासाठी विध्यार्थ्यांना वाहनांची सोय नसते. यामुळे, बऱ्याच विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहते. त्यामुळे, जिल्ह्यातील काही शाळांना आदर्श मैत्री फाउंडेशने 76 सायकलचे वाटप केले आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या सायकलच लाभ घेतला येईल. तसेच, त्यांचे शिक्षण झाल्यावर ही सायकल पुढील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल. याची व्यवस्था शाळेकडून केली जाईल. एकच सायकल पुढील अनेक वर्ष गरजू विद्यार्थ्यांना लाभ देत राहील, अशी व्यवस्था तयार करण्यात आदर्श मैत्री फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. आज या 76 सायकलचे वाटप जिल्ह्यातील काही शाळेत करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे आणि संस्थेचे पदाधिकारी यावेळी हजर होते. 


सरकारी योजनेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येत असते. मात्र, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तशी सुविधा नाही. याबाबत माहिती ज्यावेळी मिळाली त्यावेळी या गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार आला आणि आदर्श मैत्री फाउंडेशन मधील पदाधिकाऱ्यात चर्चा झाली. त्यातून सायकल बँकेची संकल्पना पुढे आली. अनेक विद्यार्थ्यांना सायकल देणे आर्थिकरित्या शक्य नाही. मग सायकल शाळेला देण्याचा निर्णय झाला. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतील सायकल त्या विद्यार्थ्याला देण्यात येईल असे ठरले. नंतर ही सायकल शाळेत जमा केली जाईल. पुढच्या वर्षीच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी ती पुन्हा देण्यात येईल, अशी माहिती आदर्श मैत्री फाऊंडेशनचे संचालक ओमप्रकाश झुरळे यांनी दिली आहे.


मंत्री बनसोडे यांची प्रतिक्रिया...


आदर्श मैत्री फाऊंडेशनने अतिशय उत्तम उपक्रम घेतला आहे. अशी उपक्रम राज्यातील इतरही ठिकाणी झाली तर शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना करावे लागणारे कष्ट कमी होतील. पास ऑन होणारी शैक्षणिक सायकल लोकसहभागातून चांगलीच गती घेईल असा विश्वास युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.


आमदार काळेंनी उपक्रमासाठी 21 सायकली दिल्या 


आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाबद्दल मला माहिती दिली. मी त्या उपक्रमामध्ये सहभागी झालो. याचा मला निश्चित आनंद आहे. राज्यात इतर ठिकाणी असे उपक्रम झाले पाहिजेत यासाठी सामाजिक संघटनांनी एकत्र यावे असे आवाहन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले आहे. विशेष बाब ही की, विक्रम काळे यांनी या उपक्रमासाठी 21 सायकली दिल्या आहेत.


समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी 76 सायकलींसाठी शक्य ती मदत पुढे होऊन केली आहे. दरवर्षी याच प्रकारचे विविध उपक्रम घेण्याचा फाउंडेशनचा मानस आहे, अशी माहिती आदर्श मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी दिली आहे. त्यामुळे समाजासाठी काही देणं लागतो ही भावना जर काही लोकांमध्ये आली तर ते एका समूहाला प्रेरित करू शकतात. त्यातून मग समाज उपयोगी विधायक कार्य होऊ शकतो हेच ह्या उपक्रमातून पहावयास मिळतो


इतर महत्वाच्या बातम्या: 


Latur Car Accident : न्यायाधीशासह वाहन चालक मित्राचा दुर्दैवी मृत्यू...रॉंग साईड आलेल्या ट्रकच्या धडकेत अपघाती निधन


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI