लातूर : गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणावरून राज्यात अनेकांनी आत्महत्या (Latur Crime News) केल्याचं समोर आलं आहे. अशातच लातूर जिल्ह्यात आरक्षण, सरकारी नोकरी आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आत्महत्येचे (Latur Crime News) नाटक रचल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. दोन मृत व्यक्तींच्या आणि एका आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीच्या नावाने मिळालेल्या सुसाईड नोट्स (Latur Crime News) प्रत्यक्षात त्यांच्या हस्ताक्षरात नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या बनावट चिठ्ठ्यांच्या आधारे समाजात खोटा समज निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने मंगळवारी तिन्ही वेगवेगळ्या समाजांच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे नोंदवले.(Latur Crime News) 

Continues below advertisement

Latur Crime News: नेमकी कुठे घडली प्रकरणे?

निलंगा तालुक्यातील दादगी येथे १३ सप्टेंबर रोजी शिवाजी वाल्मीक मेळ्ळे (वय ३२) यांचा इलेक्ट्रिक शेगडीतून विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. घटनास्थळी पंचनाम्यावेळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नव्हती. मात्र, काही दिवसांनी त्यांच्या घरातील शर्टाच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली. त्यात “महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे,” असा मजकूर होता. मात्र पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीने तपास केला असता ती चिठ्ठी मृत व्यक्तीने न लिहिल्याचे समोर आले.

अशाच प्रकारे १४ सप्टेंबर रोजी चाकूर तालुक्यातील हणमंतवाडी तांडा येथे अनिल बळीराम राठोड (वय २७) यांचा घराचे बांधकामासाठी पाणी मारताना विद्युत पंपातून विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या ठिकाणीही घटनास्थळी कोणतीही नोट आढळली नव्हती. मात्र, नंतर शिवाजी फत्तू जाधव या व्यक्तीने पोलिसांकडे एक चिठ्ठी सादर करून ती मृत अनिलने लिहिल्याचा दावा केला. त्यात “बंजारा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी आत्महत्या करीत आहे” असे नमूद होते. तपासात ही चिठ्ठी देखील बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

Continues below advertisement

दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी अहमदपूर तालुक्यातील शिंदगी येथील बळीराम श्रीपती मुळे (वय ३६) यांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारासाठी लातूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर एका नातेवाइकाने पोलिसांकडे चिठ्ठी सादर करत ती बळीराम यांनी आत्महत्येपूर्वी लिहिल्याचा दावा केला. त्या चिठ्ठीत “मराठा आरक्षण मिळावे म्हणून मी हा निर्णय घेत आहे” असा मजकूर होता. मात्र तपासात ती चिठ्ठीही त्यांच्या हस्ताक्षरात नसल्याचे निष्पन्न झाले. या तीन वेगवेगळ्या प्रकरणांतील समानता लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर खोट्या सुसाईड नोट्स तयार करून समाजभावनांशी खेळ केल्याचा आरोप निश्चित केला आहे. त्यामुळे निलंगा, चाकूर आणि अहमदपूर पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Latur Crime News: कुटुंबीयांनी किंवा ओळखीतील काही व्यक्तींनी लिहिल्या चिठ्ठ्या 

तपासादरम्यान पोलिसांनी स्पष्ट केले की या सर्व चिठ्ठ्या मृत व्यक्तींनी नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा ओळखीतील काही व्यक्तींनी लिहिल्या होत्या. या लोकांनी खोटे दस्तऐवज तयार करून केवळ प्रशासनालाच नव्हे तर संपूर्ण समाजालाही दिशाभूल केली. या प्रकरणांत संबंधितांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी इशारा दिला आहे की, सरकार किंवा समाजाला खोट्या पुराव्यांच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्टच्या घटनेत अहमदपूर तालुक्यातील बळीराम श्रीपती मुळे यांनी विष प्राशन केले होते. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीत त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख होता. मात्र तपासात समोर आले की ती चिठ्ठी प्रत्यक्षात त्यांच्या चुलत भावाने, संभाजी उर्फ धनाजी मुळे यांनी लिहिली होती.

दुसरे प्रकरण १३ सप्टेंबरचे असून, निलंगा तालुक्यातील शिवाजी वल्मिक मेळ्ळे यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या घरातून सापडलेल्या चिठ्ठीत महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार नोंदवली होती. तिसरे प्रकरण १४ सप्टेंबरचे आहे. चाकूर तालुक्यातील अनिल बळीराम राठोड यांचा देखील विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर सापडलेल्या चिठ्ठीत बंजारा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती.

Latur Crime News: प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

अहमदपूर, निलंगा आणि चाकूर ठाण्यांमध्ये दाखल तिन्ही प्रकरणांमध्ये मृत व्यक्ती तसेच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे मूळ हस्ताक्षर आणि सादर झालेल्या चिठ्ठयांवरील हस्ताक्षर जुळलं नाही. त्यानंतर चाकूर पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये चिठ्ठी लिहिणारी संशयित व्यक्ती निष्पन्न झाली. याच पद्धतीने तीनही प्रकरणांतील संशयितांचे हस्ताक्षर तपासल्यानंतर शासकीय दस्तऐवज परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. अहवालामध्ये हस्ताक्षर जुळत नसल्याचे निष्पन्न झाले.