Latur: एकीकडे स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना मराठवाड्यात सकल आदिवासी महादेव समाजानं जलसमाधी आंदोलन सुरु केलंय. आज हजारो समाज बांधव शिरूर ताजबंदच्या तळ्यावर उपस्थित झाले आहेत. जातींच्या दाखल्यांसह जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर अशा अनेक वर्षांपासून या समाजाच्या मागण्या प्रलंबित आहेत. वेळोवेळी अर्ज, विनंत्या करूनही आश्वासनांपलीकडे काहीच मिळत नसल्याने या समाजाने जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे.


काही दिवसांपूर्वी निलंगा तालुक्यात अशाच स्वरुपाचं आंदोलन महादेव कोळी समाज बांधवांकडून करण्यात आलं होतं. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठकही पार पडली होती. मात्र, हाती काहीच न लागल्यानं आज पुन्हा आंदोलन पुकारण्यात आलं. ठाम निर्धार करत समाज बांधवांनी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद च्या शेततळ्यात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वी निलंगा तालुक्यात अशा स्वरूपाचा आंदोलन समाज बांधवांकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर लेखी आश्वासन देत लवकर विषय मार्गी लावू असं सांगण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठकीही पार पडली मात्र हाती काही लागलं नाही. या सर्वाचा परिणाम म्हणून आज हे आंदोलन करण्यात येत आहे.


आंदोलनाकडे कोणीही फिरकलं नाही...


टीआरटीआय संस्थेवर नॉन ट्रायबल अधिकारी नेमणूक करण्यासह जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या उपलब्ध या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. याबाबतचा ठोस निर्णय प्रशासन जोपर्यंत हे त्यांनाही तोपर्यंत पाण्याच्या बाहेर निघणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. महादेव कोळी समाजातील स्त्री पुरुष अबालवृद्धांनी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र अद्याप प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी इकडे फिरकलेच नाहीत. यामुळे आंदोलन करते संतप्त आहेत.


काय आहेत मागण्या?


टीआरटीआय संस्थेवर नॉन ट्रायबल अधिकारी नेमणूक करण्यात जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या उपलब्ध या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.


१) विनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळींच्या जातीचे दाखले कोळी नोंदीवरून सरसकट मिळावेत.


२) ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे.


३) आदिवासीं संचालक कै. गोविंद गारे व मधुकर पिचड यांच्या निकशानुसार समान न्यायाने विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.


४) जात पडताळणी समितीच्या वतीने सुरू असलेली तपासणी तात्काळ थांबवावी.


५) शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वैधताबाबत काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे.


६) तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यानी निर्गम उतारा व पालकांची जात प्रमाणपत्र या पुराव्यावरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.