Latur Accident : लातूर जिल्ह्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेईना. उदगीर निलंगा मार्गावर अफगातामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. उदगीरमध्ये नवरेदव आणि त्याच्या भावाचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता यामध्ये आणखी भर पडली असून लातूर बीड महामार्गावरही अपघात झाला. यामध्ये पिता-पुत्राचा दुर्वैवी अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  


लातूर शहरातील कनडे परिवारातील काहीजण बाहेरगावी गेले होते. काल पहाटे लातूरकडे येत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला . लातूर बीड महामार्गावरील कोळगाव तांडा जवळ आल्यानंतर त्यांच्या गाडीला एका ट्रकने कट मारला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं. गाडी रस्त्यावरील डिव्हायडरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात मल्लिकार्जुन मनमतआप्पा कनडे आणि राहुल मल्लिकार्जुन कनडे या पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर स्थानिकांनी घटलास्थळी धाव घेतली. त्याशिवाय पोलिसांनाही पाचारण कऱण्यात आले. अपघातामध्ये गाडीतील इतर चार जण जखमी झाले आहेत.पाठीमागून त्यांच्याच परिवारातील दुसरी गाडी येत असल्याने जखमींना ततडीने लातूरमध्ये उपचार साठी हलविण्यात आले होते.याबाबत रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.