Rupali Chakankar on Chitra Wagh: महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही असं म्हणून माझा राजीनामा घेतला गेला. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. माझ्याच बाबतीत हा अपवादात्मक नियम का लावला गेला? अशी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विचारणा केली. अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर त्या प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. अजितदादा उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाला गती मिळेल, कार्यकाळ संपेपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


व्हायरल फोटोवरून खुलासा  


गेल्या काही  दिवसांपासून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. यानंतर आता अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने आता चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोवरून रुपाली चाकणकर यांनी खुलासा केला. त्या म्हणाल्या की, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत काम करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही आमच्या विचारधारेबरोबर काम करतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो दहा वर्षांपूर्वींचा आहे. तो फोटो व्हायरल करून एखाद्याचं घर चालत असेल तर नाईलाज आहे. नेते एकत्र काम करत असताना आम्ही आमची विधारधारा घेऊनच काम करतो. त्यांच्या झेंड्याखाली आम्ही काम करत नाही.


तर मलाही माहिती मिळाली पाहिजे


त्या पुढे म्हणाल्या की, पुन्हा एकदा महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मला अजित पवार यांनी दिली आहे. 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रावादीच्या मतदानाचा जो टक्का वाढलेला असेल तो राष्ट्रवादीच्या महिला संघटनमुळे असेल. आमचे दैवत शरद पवार आहेत आणि राहणार. माझ्या आयुष्याचा उभारीचा काळ मी संघटनेला दिला. कोणत्याच कार्यक्रमाला आमंत्रित न केल्याने पुण्यात एकही कार्यक्रमाला मला बोलावले नाही, तर मलाही याची माहिती मिळाली पाहिजे. मतं मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. एक संघटनेची कार्यकर्ती म्हणून मी माझी भूमिका मांडली. 


दरम्यान, उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी वादळ उठवलं होतं. या प्रकरणामुळे रूपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्याच जुंपली होती. चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटीस पाठवल्यानं वादात भऱ पडली होती. याबाबात चित्रा वाघ यांनी भाष्य करत मी अशा नोटीसांना घाबरत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र आता दोघीही एकाच सरकारमध्ये काम करणार असल्याने एकमेकींच्या पुन्हा  मैत्रिणी किंवा सहकारी होणार का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या