Hasan Mushrif on Ajit Pawar: काही राष्ट्रवादीचे जुने नेते आम्हाला पक्षातून काढून टाकणार अस बोलतात. आम्हाला कारणे दाखवा नोटीस बजावत आहेत. त्यामुळे आपला पक्ष हा राष्ट्रवादी असून अजितदादाच्या नेतृत्वाखाली आहे आणि राहील. पक्ष आणि कुटुंब एकसंध ठेवावा अशी विनंती शरद पवारांना केली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीमधील फुटीर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी आज केलेल्या ट्विटनंतर राजकीय भूवया उंचावल्या आहेत. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच असे ट्विट केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पोस्टर लावून मुख्यमंत्री होता येत नाहीत. त्यासाठी 145 आमदार लागतात असं अजितदादा पवार यांनी यापूर्वी सांगितल आहे. पण भविष्यात नियतीच्या मनात काय आहे हे सांगता येत नाही. मनात असलेलं प्रेम वाढदिवसानिमित्त अनेक जण आपल्या भूमिकेतून मांडत असतात.
सुळकूड योजनेवरून सुरु असलेल्या वादावर मुश्रीफ यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आपल्या हक्काचं पाणी जाईल म्हणून शेतकरी आणि काही कार्यकर्ते विरोध करत आहेत, पण त्यांच्या हक्काचं एक थेंबही पाणी जाणार नाही अशी मी त्यांना ग्वाही दिली आहे. या पुढील काळात मंत्रालय पातळीवर सुळकुड योजनेबाबत एक बैठक घ्यावी लागेल आणि लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. सतेज पाटील यांना खासगीत आमच्यासोबत या अशी विनंती केली होती. त्यांनी आमचा प्रस्ताव धुडकावला असला तरी आम्ही त्यांची वाट पाहू, असेही मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले.
एम्सच्या धर्तीवर राज्यातील हॉस्पिटल तयार करण्याचा मानस
दिल्लीच्या एम्सच्या धर्तीवर राज्यातील हॉस्पिटल तयार करण्याचा मानस आहे. आशियाई डेव्हलपमेंट बँकेबरोबर चर्चा झाली आहे. त्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे, ते पैसे उपलब्ध झाले तर सर्व हॉस्पिटल आणि सर्व कॉलेजेस आम्ही चांगल्या पद्धतीने करू. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभं करण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे यायला तयार आहेत. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी कोणी दानशूर व्यक्ती पुढे याला तयार असेल तर आम्ही मदत घेत हॉस्पिटल उभं करू, असे मुश्रीफ यांनी सांगितले. अनेक शासकीय महाविद्यालयात आणि हॉस्पिटलमध्ये अनेक पद रिक्त आहेत ती पूर्णपणे भरण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे, शासकीय महाविद्यालयात डॉक्टरांची फार मोठी वानवा आहे. अनेक प्राध्यापक पद रिक्त आहेत आहेत. ती भरण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
शेतकरी प्रोत्साहन अनुदान मुश्रीफ म्हणतात
प्रोत्साहनपर अनुदानाची राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी केवायसीमुळे थकली होती, पण आता प्रक्रिया सुरू असून येत्या महिन्याभरात त्यांना त्याच्या खात्यावर पैसे मिळतील, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या