कोल्हापूर : राज्यात कोणाची सत्ता येईल हे सांगता येत नाही. बदल निश्चित असला तरी या बदलाच्या तोंडावर दंगली का होत आहेत हा प्रश्न असल्याचं हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात परिस्थिती बेकाबू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा सुरू केल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रक्तपात व्हावा, असा वाटत नसल्याचे म्हणाले. तुम्हाला नाही तर कोणालाच नाही. या जरांगे पाटलांच्या वाक्यातून अनेक अर्थ निघाले आहेत. त्यातून काही अनर्थ होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ओबीसींना भीती वाटत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 100 ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत असे आम्ही आवाहन करत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 


तरी आम्ही रिस्क घेऊन यात्रा काढत आहोत


तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर बोलताना कोल्हापुरातील (Kolhapur) दोन नेते राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे छत्रपती (sambhaji Raj) यांच्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. विशाळगड दंगलीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, विशाळगडावर दोन धर्मांमध्ये भांडण लावायचं काम झालेलं आहे. आम्हाला दोन्ही बाजूने बळीचा बकरा केला जातो. आमची ढोलकी दोन्ही बाजूनी वाजवली जाते, तरी आम्ही रिस्क घेऊन यात्रा काढत आहोत. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी करायचं झाल्यास विभागवार केल्यास ते शक्य असल्याचे ते म्हणाले. मात्र, एक व्यक्तीची की पार्टी? हा विचार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने राजू शेट्टी याचा विचार करत नाहीत. संभाजी राजे छत्रपती आपल्या भूमिकेवर भूमिका ठाम राहत नसल्याने आम्ही त्यांच्याबरोबर जायला काही इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले. 


झुंज लावून काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बघ्याची भूमिका


दरम्यान, सत्ताधारी पक्षांसह विरोधकांवर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. ते म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांवर मराठा समाजाचे आहेत असा शिका लागला आहे. आरक्षणावर कोणतीही भूमिका घेत नाहीत ते टाळाटाळ करत आहेत. जरांगे पाटलांच्या भूमिकेविषयी ते काहीच बोलत नाहीत. आरक्षणासंदर्भात लोकांना कळण्यासाठी आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 22 जिल्ह्यांमध्ये यात्रा काढणार असून सात ऑगस्टला याची सांगता छत्रपती संभाजी नगरमध्ये होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सगेसोयरे हा मुद्दा टिकणार नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. झुंज लावून काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली.