कोल्हापूर : उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, अशी भावना व्यक्त करत गेल्या दीड वर्षांपासून हे प्रकरण घेतल्यानंतर उशिरा का असेना योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर पोहोचले. यानंतर कोल्हापुरात पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार अपात्रता याप्रकरणात निकाल संदर्भात दोन शक्यता व्यक्त केल्या आहेत. राजकीय पक्ष फोडून करिअर संपवून आणि परिवार फोडून भाजपने काय मिळवलं? सत्ता गेलेल्याचं दुःख नाही तुम्ही पक्ष आणि सत्ता चोरली. एवढं करून देखील तुम्ही राज्यातील युवा ना रोजगार देऊ शकत नाही. अनेक रोजगार गुजरातला घेऊन जात आहेत. इतकं घाणेरडं राजकारण माझ्या आयुष्यात मी कधीही पाहिलेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 


विधानसभा अध्यक्ष स्वतःच नाव खराब करून घेण्याचं काम करणार नाहीत


बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे न्याय दिल्यास 40 गद्दार बाद ठरू शकतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र भाजपला संविधान लिहायचा आहे आणि आंबेडकरांचे संविधान बदलायचा आहे त्याप्रमाणे न्याय दिला तर आम्ही बाद होऊ. जग बघत आहे, ज्या भारताला लोकशाहीचा देश मानतो तिथं लोकशाही टिकेल की नाही अशी स्थिती निर्माण झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्ष स्वतःच नाव खराब करून घेण्याचं काम करणार नाहीत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 


न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला जाण्याचा प्रकार


जो निकाल येईल तो येईल, पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या भेटीला विधानसभा अध्यक्ष जातात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला जाण्याचा प्रकार असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. वर्षा बंगल्यावर सेटलमेंट करायला लवादाचे अध्यक्ष म्हणून गेले होते, न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना तुम्ही असं करत असं करू शकत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 


दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर आणि कोल्हापुरातील दोन्ही जागांवरही भाष्य केले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, इंडिया आघाडी देशभक्तांची आघाडी आहे, आम्ही संविधान बदलून देणार नाही आणि लोकशाही बदलू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. 


हातकणंगले लोकसभा जागा सोडण्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?


महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोल्हापुरातील दोन्ही जागा जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ही जागा आता कळीचा मुद्दा झाला आहे. या जागेवरून आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला असता त्यांनी या संदर्भातील जर तरच्या गोष्टींवर आताच काही बोलण्यावर काही अर्थ नसल्याचे सांगत सावध पवित्रा घेतला. जे निष्ठावंत आहेत ते सोबत आहेत आम्ही त्यांना पुढे घेऊन जाऊ, असे त्यांनी नमूद केले. ही लढाई केवळ निवडणुकीची नाही, केंद्रात सरकार कोण बनवेल हा विषय नंतर आहे, मात्र महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल हे महत्त्वाचं असल्याचे ते म्हणाले. 


बुलेट ट्रेनवर आदित्य ठाकरे काय म्हणाले?


सध्या व्हायब्रेट गुजरात सुरू आहे हे झाल्यानंतर महाराष्ट्रातील उद्घाटन सुरू होतील. बुलेट ट्रेनसाठी बीकेसीमधील जागा फुकट दिली आहे. मात्र, टोल एमटीएचएलला लावला आहे. महाराष्ट्रातील नागरिक असतील तर टोल त्यांनी भरावा पण आम्हाला फुकट पाहिजे अशी स्थिती झाली आहे. हे सरकार टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला घेऊन जातील. 


इतर महत्वाच्या बातम्या