Chandrakant Patil : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पुण्यात (Pune) शाईफेक करण्यात आला. शाईफेक करणाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूरमधील भाजप नेते महेश जाधव यांनी चंद्रकात पाटील यांच्यावरी शाई हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, पण आम्ही दादांवरील हल्ला खपवून घेणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला. चंद्रकांत पाटील यांनी शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली, तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता? असे वक्तव्य केल्यानंतर राज्यभर संतापाचा उद्रेक झाला आहे. त्याचे पडसाद पुण्यातही उमटले.


पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी आज मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. एका कार्यकर्त्याच्या घरी थांबून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या शाई हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना महेश जाधव म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंचवड चिंचवडमध्ये समता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या शाईफेकीचा मी निषेध करत आहे. पक्षाच्या वतीने मी त्याचा निषेध करतो. एखाद्यावर हल्ला करून काय साध्य केलं? असे हल्ले करून त्यांना काही मिळणार नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारचे चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. तरीसुद्दा त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दादांनी दिलगिरी व्यक्त केली होती. अनेक पक्षातील अनेक नेत्यांनी चुकीची वक्तव्ये केली आहेत, पण त्यासाठी हा मार्ग नव्हे, आम्ही सुद्धा असे हल्ले करू शकतो. हा लाजीरवाणा आणि चुकीचं झालं आहे. 


ते पुढे म्हणाले की, तुम्हाला हल्ले करता येतात तसे आम्हालाही करता येतात. असे हल्ले करून तुम्ही चंद्रकांतदादांचे कार्य तुम्ही पुसू शकत नाही.  फुले, शाहू आंबेडकरांचे विचार पुढे नेणारा कोण नेता असेल, ते फक्त दादा आहेत. त्यांनी केलेलं कार्य पाहायचं असेल, तर तुम्ही या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हा हल्ला निषेधार्ह हल्ला असून ते खपवून घेतले जाणार नाहीत. मग कोणीही असूदेत. प्राण गेला तरी बेहत्तर आम्ही दादांवरील हल्ले खपवून घेणार नाही. 


भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदारसंघ; काँग्रेसची बॅनरबाजी


दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यातील कोथरुड  भागात लावण्यात आले आहेत. "भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदारसंघ" असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. बॅनरवर काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा कार्टूनसारखा फोटो बॅनरवर लावण्यात आलं आहे. शहरात कोथरुड भागातच नाही तर इतर भागात देखील असे बॅनर लावण्यात आले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या