Kolhapur News : लेकीचं थाटामाटात लग्न हा प्रत्येक बापाच्या आयुष्यातील सोहळा असतो. हा सोहळ्यासाठी तो आयुष्यात कमावलेली पूंजी लावत असतो. मात्र, त्याच बापाला लेकीच्या लग्नाची धावपळ सुरु असताना शेवटची वेळ देण्याची एक आली तर त्यासारखे दुर्दैवी काहीच नाही, पण असाच अत्यंत दुर्दैवी प्रसंग कोल्हापूरमध्ये घडला. नवरदेवाला आणण्यासाठी पुण्याला जात असताना शिवाजी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक नरेंद्र वामनराव देशपांडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. 


देशपांडे यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लेकीच्या विवाहानिमित्त धांदल सुरू होती. शुक्रवारी त्यांच्या मुलीचा विवाह होता. तत्पूर्वी, गुरुवारी सिमांत पुजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी पुण्यातून नवरदेवाला आणण्यासाठी कारने जात असताना शिरवळजवळ ट्रकला कारची धडक झाल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचे निधन झाले. निधनाची बातमी विवाहस्थळी पोहोचताच विवाह समारंभावर शोककळा पसरली. 


देशपांडे यांची मुलगी मनालीचा उत्तर प्रदेशातील नवरदेव अतुल शर्मा यांच्याशी निश्चित झाला होता. ते दोघेही सध्या जपानमध्ये असतात. मात्र, त्यांचा विवाह कोल्हापूरमध्ये होणार होता. मात्र, नियतीने वडिलांवर घाला घातला. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. मयतदेशपांडे यांच्या पत्नी सुनीता जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष (कै) आबासाहेब भोगावकर यांच्या कन्या आहेत.


बिहारच्या तरुणाचा अपघाती मृत्यू; आई-वडिलांची शेवटची भेटही नाही


दरम्यान, आणखी एक दुर्दैवी प्रकार कागल पंचतारांकित एमआयडीसीत घडला. बँकेत पगार जमा करण्यास जात असतानाच भरधाव कार उडवल्याने बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील सोनूकुमार हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. पगार जमा करण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर घाला घातला.


सोनूकुमारचे गावचे कोल्हापूरपासून जवळपास तीन दिवसांचे अंतर असल्याने आई-वडिलांना अंत्यदर्शनही घेता आले नाही. त्याच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांनी फोन करून माहिती देण्यात आली. त्याच्या घरी आई-वडील, तीन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. 18 वर्षे पूर्ण होताच कागल पंचतारांकित कंपनीत तो कामासाठी आला होता. गुरुवारी तो आणि त्याचा सहकारी पंकज कुमार हे पगाराचे पैसे घरी पाठविण्यासाठी दुचाकीवरून जवाहर साखर कारखान्याकडे जात असताना अपघात घडला.


इतर महत्वाच्या बातम्या