Kolhapur News : कोल्हापूर शहरातील उद्या 'ए' आणि बी वॉर्डातील पाणीपुरवठा बंद राहणार

Kolhapur News : बालिंगा जल उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामामुळे बालिंगा अशुध्द/शुध्द जल व नागदेववाडी अशुध्द जल उपसा केंद्रावरुन पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Continues below advertisement

Kolhapur News : बालिंगा जल उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामामुळे विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये बालिंगा अशुध्द/शुध्द जल व नागदेववाडी अशुध्द जल उपसा केंद्रावरुन पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उद्या सोमवारी बालिंगा जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या भागाला दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. 

Continues below advertisement

त्यामुळे ए, बी, वॉर्ड त्यास संलग्न असलेल्या उपनगरातील लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी परिसर, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजीपेठ परिसर, चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाव्दार रोड परिसर, मंगळवार पेठ काही भागांचा समावेश आहे. तर संपूर्ण सी डी वॉर्डमधील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब्रम्हपुरी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवारपेठ चौक परिसर, सोमवारपेठ परिसर, ट्रेझरी ऑफीस परिसर, बिंदुचौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, गुजरी परिसर, मिरजकर तिकटी, देवलक्लब तसेच ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपूरी 5,6,7,8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक या परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. 

तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola