Kolhapur News : करवीर तहसिलदार कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात महाराणी ताराबाई महाविद्यालय (बी.टी. कॉलेज इमारत) च्या तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती करवीरच्या तहसिलदार शीतल मुळे-भामरे यांनी दिली आहे. या ठिकाणी दप्तर सुव्यवस्थित लावणे, विद्युत जोडणी, इंटरनेट जोडणी व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी दि. 30 व 31 जानेवारी 2023 रोजी सर्व नागरिकांसाठी कार्यालयीन कामकाज व सेवा बंद राहणार आहेत. 1 फेब्रुवारी 2023 पासून तहसील कार्यालय, करवीरचे कार्यालयीन कामकाज बी.टी. कॉलेज, शाहुपुरी येथे पूर्ण क्षमतेने सुरु राहील, असेही मुळे-भामरे यांनी कळविले आहे. 


दरम्यान, करवीर तहसील कार्यालय नव्या इमारतीचे बांधकाम सुरू केली जाणार आहे. कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून निविदाही मंजूर करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ केला जाणार आहे. येत्या दोन ते अडीच वर्षात इमारतीची बांधकाम पूर्ण होणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयाचे कामकाज बी टी कॉलेज येथून होणार आहे. करवीर तहसील कार्यालयांतर्गत 129 गावे व शहर येते. येथील सर्व विद्यार्थांसह इतरांना दाखले दिले जातात. याच कार्यालयांतर्गत 150 हून अधिक महा ईसेवा केंद्र चालक काम करतात. 


शेंडा पार्कमधील मोकळ्या जागेचा वापर करा


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Shenda Park kolhapur) शेंडा पार्क परिसरातील मोकळी जागा विविध शासकीय कार्यालये आणि सुविधा विकसित करून वापरण्यासाठी सांगितले आहे. शेंडा पार्कमधील विस्तीर्ण परिसराचा विकास झालेला नाही. काही भूभाग कृषी विभागाच्या अखत्यारीत आहे, तर काही पट्ट्यांवर आरोग्य विभागाचे नियंत्रण आहे. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी येथे कृषी विभाग वृक्षारोपण केले जाते. आरोग्य विभागाच्या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहे आणि कुष्ठरोग केंद्र आहे.


शेंडा पार्कच्या जागेचा उपयोग जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा ग्रंथालय, मेट्रोलॉजी सेंटर, आरोग्य प्रयोगशाळा, जिल्हाधिकारी कार्यालय, गोडाऊन, वसतिगृहे, पोलिस स्टेशन, मध्यवर्ती इमारत, प्री-एनडीए अकादमी आणि आयटी पार्क विकसित करण्यासाठी केला जावा. या सर्व कामांसाठी जमीन आवश्यक आहे. आरोग्य आणि कृषी विभागांचे अभिप्राय घेऊन या कामांसाठी उपलब्ध जमीन आणण्यासाठी पावले उचलली जावीत,असे आदेशात म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या