Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणातील गळती रोखण्यासाठी प्रस्तावित ग्राऊंटिंग कामासाठी चार टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. येत्या पाच दिवसात म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत काळम्मावाडी धरणातून चार टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. 


पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पाच वक्राकार दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडले आहेत. त्यामधून प्रतिसेकंद 3 हजार क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू आहे. त्यामुळे 23 वर्षांत यंदा पहिल्यांदाच धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं नसेल. यंदा धरणामध्ये 78 टक्के इतका पाणीसाठा असेल. यंदा धरण 90 टक्के भरले आहे. धरणात 23 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 


चार टीएमसीने पाणीसाठा कमी करून ते सांडवा पातळीपर्यंत म्हणजे 19.70 टीएमसी ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी धरणाच्या वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांडवा पातळीपर्यंतच्या अधिकच्या पाणीसाठ्यात आगामी आठवड्याभरात टप्प्याटप्प्याने घट होणार आहे. पाणी पातळी 15ऑक्टोबरपर्यंत 641 मीटर इतकी राहील, असे यंदाचे पाणीसाठ्याचे नियोजन आहे.


साठ्याच्या नियोजनामुळे पुढील वर्षी मे महिन्यात प्रस्तावित ग्राऊंटिंग काम सुरळीतपणे अधिक पाणीसाठ्याचा अडसर न येता सुरू होणार आहे. गतवर्षी मे अखेरीपर्यंत धरण पाणीसाठ्यात 611 मीटरपर्यंत घट झाली नव्हती. त्यामुळे ग्राउंटिंग काम लांबणीवर पडले होते. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातच धरणात सांडवा पातळीपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन जलसंपदा विभागाने आखले आहे. त्यानुसारच धरणातून पूर्ण साठा होण्यापूर्वीच पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे.




इतर महत्वाच्या बातम्या