Kolhapur Collectorate Office: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज (12 डिसेंबर) एका अज्ञात व्यक्तीकडून बॉम्बची धमकी मिळाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत ई-मेलवर थेट ही धमकी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली असून, घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. तातडीने परिसरात तपासणी आणि सुरक्षाव्यवस्थेची गडबड सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेलवर आलेल्या संदेशात कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क करून परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आवश्यक कारवाईचे निर्देश दिले.

Continues below advertisement

5 आरडीएक्स बॉम्ब लावले आहेत

धमकी संदेशात “जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले 5 आरडीएक्स बॉम्ब लवकरच फुटतील” असा उल्लेख असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल होऊन इमारतीची आणि संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी करत आहे. अग्निशमन दलाची टीमही सज्जस्थितीत परिसरात पोहोचली आहे. घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी प्रवेशद्वारावर कडक तपासणी सुरू आहे. धमकी पाठवणाऱ्या ई-मेलचा शोध घेण्यासाठी सायबर सेल सक्रिय झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement