Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर व जिल्हा तीन आसनी प्रवासी रिक्षा युनियनने २६ जानेवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला घेराव करण्याचे नियोजन केले आहे. रिक्षा युनियनचे सदस्य जाफर मुजावर म्हणाले की, कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा चालकांनी 31 ऑक्टोबर रोजी केएमसीला घेरावाचा इशारा दिला होता. त्यानंतर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जे केएमसीचे प्रशासक देखील होते. त्यांनी महापालिका अधिकारी आणि रिक्षा युनियन यांची बैठक घेतली. या बैठकीत महापालिका  अधिकाऱ्यांनी महिनाभरात सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. 


कृती समितीचे सदस्य बाबा इंदुलकर म्हणाले की, दोन महिने उलटले तरी रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. नवीन रस्त्यांचे काम सोडाच, शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते भरण्यातही महापालिकेने कोणताही रसा दाखवलेला नाही. (Kolhapur Worst Road) 


रस्त्यांची वाताहत, अधिकारी धारेवर 


दरम्यान, शहरातील रस्त्यांची वाताहत झाली असल्याने चौफेर टीका कोल्हापूर मनपा प्रशासनावर होत आहे. मनपा (Kolhapur Municipal Corporation) प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे (kadambari balkawade) यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना नोटीस बजावून रस्ते कामाचा हिशेब मागितला आहे. रस्ते कामांचा स्पष्ट अहवाल न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


तसेच रस्त्यांच्या कामात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत तीन विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यांना सुद्धा प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. गांधी मैदान विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील, छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता नारायण भोसले यांना प्रत्येकी एक हजाराचा दंड करण्यात आला होता. राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे निवृत्त उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांना पाच हजाराचा दंड करण्यात आला आहे. या सर्वांनी रस्ते कामाच्या नियोजनात तसेच अंमलबजावणीत दुर्लक्ष केल्याबद्दल कारवाई केली होती. 


त्याचबरोबर ठरवून दिलेल्या मुदतीत काम चालू केले नसल्याने ठेकेदार शैलेश भोसलेला 24 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. महापालिकेकडील 119 कामासाठी 39 ठेकेदारांना विहित मुदतीत काम चालू केले नसलेने त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या