Sweet Moon in Germany: राष्ट्रीयच नव्हे तर आतरराष्ट्रीय स्तरावरही लक्षवेधी ठरत असलेल्या 'स्वीट मून' (Sweet Moon) या मयूर प्रकाश कुलकर्णीच्या दृश्यकाव्य शैलीत एक वेगळा कलात्मक अनुभव संवेदनशील मनांना देणाऱ्या लघुपटाला जर्मनीमधील स्टुटगार्ट येथे होत असलेल्या 22व्या 'द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ स्टुटगार्ट 'मध्ये उत्कृष्ट लघुपटासाठीच्या स्पर्धात्मक विभागात स्थान देण्यात आले आहे. स्टुटगार्ट येथे होणारा महोत्सव हा एक प्रतिष्ठेचा महोत्सव मानला जातो. अशा दर्जेदार चित्रपट-लघुपट महोत्सवात 'क्वीट मून'ला स्पर्धात्मक विभागामध्ये अधिकृतपणे स्थान आणि दिग्दर्शक म्हणून मयूर कुलकर्णी जर्मनीमध्ये महोत्सवास निमंत्रित केले जाणे ही कलापूर कोल्हापूरसाठी एक विशेष सन्मानाची बाब आहे.

कोल्हापुरात बनलेल्या लघुपटाला असा सन्मान प्रथमच लाभला आहे. मयूर कुलकर्णी व्यवसायाने कमर्शियल आर्टिस्ट असला तरी त्याने आतापर्यंत 'भवताल', 'ओरिजिन' व 'स्वीट सून' असे तीन कलात्मक लघुपट बनवले आहेत आणि तिन्ही लघुपटाना राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर समीक्षकांची चांगली दाद मिळाली आहे. कुलकर्णी यांनी कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीसाठी प्रदीर्घ काळ योगदान करत असल्याने त्यांच्या लघुपटांना मिळणारे यश हे फिल्म सोसायटीसाठी सुद्धा अभिमानास्पद आहे.

अनेक देशात लघुपट प्रदर्शित

जर्मनीतील स्टुटगार्ट येथे 23 ते 27 जुलै 2025 या कालावधित होणाऱ्या महोत्सवात स्पर्धात्मक विभागामध्ये निवडला गेलेला स्वीट मून हा लघुपट या आधी चीन, इंग्लंड, ब्राझिल, पोलंड, पेरू, अझरबैजान, बल्गेरिया, क्वालालामपूर, अथेन्स आदी ठिकाणी प्रद‌‌िर्शत झाला आहे. अनेक ठिकाणी उत्कृष्ट लघुपट तसेच उत्कृष्ट छायाचित्रणासाठी पुरस्काराचा मानकरी मानकरी ठरला आहे. राष्ट्रीय पातळीवर अनेक महोत्सवात देखील या लघुपटाचा सन्मान झाला आहे. स्टुटगार्ट येथील महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागात सन्मानाने स्थान व मयूर कुलकर्णी जर्मनीत येण्याचे निमंत्रण हा आजवरचा सर्व सन्मानापेक्षा मोठा सन्मान आहे.  'स्वीट मून' या 15 मिनिटांच्या लघुपटाचे छायाचित्र संकलन व दिग्दर्शन मयूर कुलकर्णीचं आहे. साऊंड डिझाईन महादेव पाटील यांचे आहे. कौस्तुभ देशपांडे कार्यकारी निर्माता आहेत तर शिशिर चौसाळकर, करण चव्हाण, महादेव चांदेकर रवींद्र सुतार, विक्रम पाटील, ऋषिकेश जोशी व साई पोतदार यांचे सहकार्य लाभलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या