Kolhapur, Shivaji University : गेल्या काही दिवसांपासून पावसाने कोल्हापुरात जोरदार हजेरी लावलीये. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुसळधार फटका पावसाचा शिवाजी विद्यापीठाला  बसलाय. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. 23 आणि 24 जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील रस्ते बंद झाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका बसलाय. 


सध्या पंचगंगा इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे 


कोल्हापुरातील पंचगंगा नदीने आता इशारा पातळी ओलांडली असून तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. सध्याची पाण्याची पातळी 39.4 फुटांवर आहे. शिवाय जिल्ह्यातील तब्बल 78 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी जेव्हा इशारा पातळी ओलांडते तेव्हा कोल्हापूर शहरा लगत असणाऱ्या चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांना स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात. सध्या पंचगंगा इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे चालली आहे. प्रयाग चिखली या गावात भोगावती-तुळशी, कुंभी-कासारी आणि सरस्वती ही गुप्त नदी आशा पाच नद्यांचा संगम होतो आणि तिथून पुढं पंचगंगा नदीची सुरुवात होते. त्याच प्रयाग चिखली येथे सध्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलीये.


कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पाण्याच्या फुगवट्याला निसर्ग जबाबदार नसून कोल्हापूरच्या पूर्वेला असणारा महामार्ग जबाबदार 


कोल्हापूरकर 2019 पासून दरवर्षी पंचगंगा नदीच्या पाणीपातळीचा सामना करतात. कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पाण्याच्या फुगवट्याला निसर्ग जबाबदार नसून कोल्हापूरच्या पूर्वेला असणारा महामार्ग जबाबदार आहे, अशी मांडणी कोल्हापूर जिल्ह्यातील 125 पूरग्रस्त गावातील नागरिकांनी केली. हा महामार्ग तयार करताना जो भराव टाकला आहे त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाणी पूर्वेला जात नाही. त्यामुळे कोल्हापूर शहर आणि पश्चिम भागात पाणी साचून राहतं. या महामार्गाच्या भरावाला पूरग्रस्त संघर्ष समितीचे समनव्यक बाजीराव खाडे आणि गावकऱ्यांनी विरोध केला, पण 2019 सालापासून आजपर्यंत प्रशासनाकडून काहीही उपाय करण्यात आले नाहीत, अशी टीका बाजीराव खाडे यांनी केलीय.


इतर महत्वाच्या बातम्या


Dhairyasheel Mohite Patil : इथून पुढं माण तालुक्यात नुरा-कुस्ती चालणार नाही, वस्तादांचे वस्ताद शरद पवार योग्य उमेदवार देतील : धैर्यशील मोहिते पाटील