Kolhapur Worst Road : गुडघाभर खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कोल्हापुरात पर्यटकांची संख्या वाढतच चालली असल्याने त्यांचे स्वागत गुडघाभर खड्ड्यात आणि फुटभर वरती आलेल्या ड्रेनेजच्या झाकणांनी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.
कोल्हापुरातील रस्त्यांच्या संदर्भातील प्रकार भयानक असल्याचे ते म्हणाले. आंदोलन झाली, बातम्या झाल्या तरी प्रशासन लक्ष का देत नाही? अधिकारी आधी टक्केवारी घ्यायचे आता तेच ठेकेदारांचे पार्टनर आहेत का? अशी शंका आहे. ठेकेदारांचे लाड का केले जातात? केवळ एक नोटीस द्यायची आणि बाजूला व्हायचं असं चाललं आहे. पर्यटनाला आलेले नागरिक कोल्हापूरला नावं ठेऊन जात आहेत. कोल्हापूर आहे की खड्डेपूर असं नागरिक म्हणतात. पहिल्यांदा शहर अभियंता नेत्रदी सरनोबत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संजय पवारा यांनी केली.
कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक भवन होऊ देणार नाही
मुंबई ही कुणाच्या बापाची नाही, आमचं नाक आहे. कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अशी वक्तव्य केली जातात. कर्नाटकच्या नेत्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विकासासाठी कितीही पैसे द्या आम्ही स्वागत करू, राष्ट्रपती, पंतप्रधान कणेरी मठावर आले तर स्वागतच आहे, पण कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक भवन होऊ देणार नाही. कर्नाटक नाव मठाला लागणार नाही याची शपथ आम्ही घेतली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला.
सांगून या ना महापालिकेत येतो
संजय पवार यांनी शिंदे गटावरही टीका केली. ते म्हणाले, दबाव टाकण्याच्या शिवाय शिंदे गट काय करू शकतो? विकासावर हे बोलू शकत नाहीत, विकासाचे मुद्दे गुजरातला गेले आहेत. दुसरे काय करायचे तर शिवसेनेवर दबाव टाकायचा. महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्या वेळी शिवसेनेवर दबाव टाकला त्यावेळी शिवसेना चौपट वाढली आहे. निवडणुका होऊ दे मग कळेल. सांगून या ना महापालिकेत येतो, सेना भवन जवळ येतो, जे जे आले त्यांना हिसका दिला आहे, कुठं गेले भोंगेवाले, कुठं गेले हनुमान चालीसा वाले? असा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या