Dhairyasheel Mane : शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून टोकाचा विरोध झाल्याने उमेदवारी रद्द करण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आली होती. त्यानंतर हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर सुद्धा टांगटी तलवार होती. भाजपकडून माने यांच्या उमेदवारीला सुद्धा कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे भाजप नेत्यांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. भाजपकडून सुद्धा पर्यायी उमेदवारांची चाचपणी सुरू होती.
धैर्यशील माने यांची उमेदवारी वाचली
मात्र, आता या ठिकाणची परिस्थिती बदलल्याने धैर्यशील माने यांच्यावरील टांगती तलवार दूर झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दुरंगी लढत अपेक्षित होती. माने विरुद्ध राजू शेट्टी यांचा थेट सामना होणार होता. मात्र, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याने धैर्यशील माने यांची उमेदवारी वाचली गेली आहे.
चौरंगी लढतीने चित्र बदलले
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला पाठिंबा न दिल्याने राजू शेट्टींविरोधात उमेदवार देण्यात आला आहे. राजू शेट्टी यांनी मतविभागणी टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोनवेळा भेट घेत पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र, ठाकरेंनी पाठिंबा न देता मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे शेट्टी स्वत:चे चिन्ह असल्याने ठाकरेंच्या मशाल चिन्हावर लढण्यास स्पष्ट नकार दिला होता. यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आला. वंचितकडूनही डी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्याता आली आहे. त्यामुळे आता वन टू वन लढत अपेक्षित असतानाच थेट चौरंगी लढत झाल्याने उमेदवारांना शेवटपर्यंत टेन्शन असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या