कोल्हापूर : आता आमचा योग्य पद्धतीने सुखाचा संसार (महायुतीला उद्देशून) सुरू झाला आहे. 2024 मधील लोकसभेला 45 जागा (Loksabha Election) आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या (Maharashtra Election) 200 जागा आम्ही जिंकू, असा दावा उत्पादन शूल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला. ते आज कोल्हापुरात बोलत होते. यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी अजित पवार (Shambhuraj Desai on Ajit Pawar over Satara Loksabha) यांनी सातारा लोकसभा जागेवर केलेल्या दाव्यावरही भाष्य केले. 


महायुतीमध्ये राष्ट्रवादी आत्ताच सहभागी (Shambhuraj Desai on Ajit Pawar)


शंभूराज देसाई यावेळी बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये राष्ट्रवादी आत्ताच सहभागी झाला आहे. सातारमधील आताचे खासदार श्रीनिवास पाटील शरद पवारांच्या गटात आहेत. दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो. मात्र, सातारा लोकसभा जागेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा एकत्र बसून निर्णय घेतील. 


जरांगे पाटलांनी संयम पाळावा (Shambhuraj Desai on Manoj Jarange Patil)


मंत्री शंभुराजे देसाई यांनी आरक्षणावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आम्ही अधिवेशनात सरकार मराठा समाजासह धनगर आणि इतर आरक्षणावर सकारात्मक चर्चा करणार आहोत. कोणाचं तरी काढून कोणाला तरी दिले जाईल असा एक गैरसमज सध्या जात आहे. कोणाचाही काढून न घेता आणि कायदेशीर दृष्ट्या टिकणारी आरक्षण हे सरकार देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


त्यांनी पुढे सांगितले की, आंदोलनात दगडफेक,जाळपोळ,पोलिसांवर हल्ले झाले तर वेगवेगळ्या नियमानुसार कारवाई होत असते. सरकार जाणीवपूर्वक कठोरपणे कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे हे त्यांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे त्यांनी संयम पाळावा, असेही ते म्हणाले. 


दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची माहिती नाही. मागणी करत असताना सनदशीन मार्गानेच करावी, कोणीही कायदा हातात घेऊ नये असे त्यांनी सांगितले. 


काय म्हणाले होते अजित पवार?


कर्जतमध्ये कार्यकर्त्यांच्या शिबीरमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार असल्याचे सांगितले होते. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्यांची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या